उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात कचऱ्याचे ढीग; सर्वत्र दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:47 AM2021-09-14T04:47:20+5:302021-09-14T04:47:20+5:30

उल्हासनगर : संततधार पावसामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन कचऱ्याच्या गाड्या खाली करण्यास उशीर होत आहे. परिणामी ...

Piles of rubbish in the rainy season in Ulhasnagar; Stink everywhere | उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात कचऱ्याचे ढीग; सर्वत्र दुर्गंधी

उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात कचऱ्याचे ढीग; सर्वत्र दुर्गंधी

Next

उल्हासनगर : संततधार पावसामुळे डम्पिंग ग्राऊंडच्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन कचऱ्याच्या गाड्या खाली करण्यास उशीर होत आहे. परिणामी शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने नागरिकांचे जिणे मुश्कील झाले आहे.

उल्हासनगरातील कचरा उचलण्याचा ठेका महापालिकेने एका खासगी कंपनीला दिला असून दिवसाला ४ लाखांपेक्षा जास्त खर्च कचरा उचलण्यावर केला जातो. या व्यतिरिक्त कचरा सपाटीकरणावर कोट्यवधींचा खर्च महापालिका करते. दरम्यान, संततधार पावसाने डम्पिंग ग्राऊंडचा रस्ता चिखलमय झाला असून कचऱ्याच्या गाड्या डम्पिंगवर उंच ठिकाणी नेताना चालकांना कसरत करावी लागते. निसरड्या रस्त्यामुळे व कचऱ्याचा उंच डोंगर झाल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी व्यक्त केली. यापूर्वी कोट्यवधीचा खर्च करून गाड्यांसाठी बनविलेला रस्ता व रॅम गेला कुठे, असा प्रश्नही त्यांनी केला.

कॅम्प नं-५ येथील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचे डोंगर उभे राहिलेत. हा डोंगर कोसळल्यास मोठा अनर्थ घडण्याची भीती कामगार व्यक्त करत आहेत. येथील डम्पिंग हटविण्याची मागणी शिवसेनेसह स्थानिक नागरिक करत आहेत. मात्र, महापालिकेकडे पर्यायी जागाच नाही. राज्य शासनाने तीन वर्षांपूर्वी शेजारील उसाटने गाव हद्दीत एमएमआरडीएच्या ताब्यातील ३० एकर जागा कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेला हस्तांतरित केली. मात्र, स्थानिक नागरिकांसह आमदार गणपत गायकवाड यांनी विरोध केल्याने महापालिकेसमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले.

.................

कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा लावणार

गणेशोत्सवादरम्यान कचऱ्याच्या प्रमाणात वाढ झाली असून संततधार पावसाने डम्पिंग ग्राऊंडकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला. गाड्यांमधून कचरा खाली करण्यास उशीर लागत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी मनिष हिवरे यांनी दिली. शहर कचरामुक्त करण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा लावणार असल्याचे हिवरे यांनी सांगितले.

.........

Web Title: Piles of rubbish in the rainy season in Ulhasnagar; Stink everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.