‘पेसा’ शिवाव प्रकल्प राबवणार नाही

By admin | Published: April 20, 2017 03:55 AM2017-04-20T03:55:21+5:302017-04-20T03:55:21+5:30

पालघर जिल्ह्यात कोणताही प्रकल्प राबविताना कायद्याला बगल देऊन तो पुढे रेटला जाणार नाही ही माझी भूमिका असून, कोणत्याही कायद्याची

The 'Pisa' Shiva Project will not be implemented | ‘पेसा’ शिवाव प्रकल्प राबवणार नाही

‘पेसा’ शिवाव प्रकल्प राबवणार नाही

Next

पालघर: पालघर जिल्ह्यात कोणताही प्रकल्प राबविताना कायद्याला बगल देऊन तो पुढे रेटला जाणार नाही ही माझी भूमिका असून, कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करताना पेसा कायद्याला डावलून जिल्ह्यात वाढवणं बंदरासह कोणतेही प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव प्राप्त करणे क्र मप्राप्त राहील असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर ह्यांनी सांगितले.
वाढवण बंदर, मुंबई वडोदरा जलद महामार्ग, बुलेटट्रेन, कॉरीडॉर या सारखे प्रकल्प राबविण्यासाठी त्या त्या गावच्या ग्रामसभेपुढे जावेच लागेल अशी सप्ष्ट ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. वाढवणं बंदर प्रकल्पासह अन्य प्रकल्प स्थानिकांवर लादण्याचा प्रयत्न बेमालम पणे केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी एकता परिषद, भूमीसेना, शेतकरी संघटना, वाढवण बंदर विरोधी संघर्ष समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार संघ, नॅशनल फिश फोरम, भारतीय पर्यावरण चळवळ आदी संघटनाच्या शिष्टमंडळा समवेत समस्यावर सविस्तरपणे चर्चा करताना जिल्हाधिकारी बोलत होते. या शिष्टमंडळात दत्ता करबट, वाहरू सोनावणे, सुरेश हंडवा, डॉ.सुनील पऱ्हाड, संतोष पावडे, नारायण पाटील, वैभव वझे, रामकृष्ण तांडेल, ज्योती मेहेर आदींनी सहभाग घेतला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी सुरवातीलाच या प्रकल्पा संदर्भात निवेदने आणि झालेल्या चर्चेचे इतिवृत्त सविस्तरपणे सरकारकडे पाठविले जाईल असे सांगिलते. तर सूर्याप्रकल्पाचे पाणी जवळच्या स्थानिकांना मिळत नसल्याने लोकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो, असे सांगून या बाबतही सरकारला आपण अवगत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The 'Pisa' Shiva Project will not be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.