पिसवली शाळेतील मुलांचा ‘जल्लोष’, वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 02:05 AM2019-02-07T02:05:30+5:302019-02-07T02:05:48+5:30

भरतनाट्यम्, कोळीगीते, कोकरू नृत्य, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच नाटक, विविध वेशभूषा सादर करत पिसवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला.

Pisavali school news | पिसवली शाळेतील मुलांचा ‘जल्लोष’, वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पिसवली शाळेतील मुलांचा ‘जल्लोष’, वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

Next

डोंबिवली : भरतनाट्यम्, कोळीगीते, कोकरू नृत्य, आदिवासी नृत्य, देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच नाटक, विविध वेशभूषा सादर करत पिसवली येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘जल्लोष’ साजरा केला.

पिसवली शाळेने पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रमांची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षीप्रमणे ‘जल्लोष’ हे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात प्रत्येक मुलाचा सहभाग कसा राहील, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले. या संमेलनाला अडीच ते तीन हजार विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कला सादरीकरणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली. संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून दर दोन कार्यक्रमानंतर लकी ड्रॉ काढून भाग्यवंत विद्यार्थ्याला बक्षीस देण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी असे कार्यक्रम वारंवार केले जावेत, अशी अपेक्षा नगरसेवक कुणाल पाटील यांनी व्यक्त केली.
माजी सरपंच प्रल्हाद भोईर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सविता मिसाळ, उद्योगपती अनिल पाटील, विलास भोईर, भगवान माळी, अशोक पासलकर, चंद्रकांत अहिरे, जीवन मढवी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले.
 

Web Title: Pisavali school news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.