पिसवली शाळेतील मुलांनी केली वाईट विचारांची होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 07:05 PM2018-02-28T19:05:22+5:302018-02-28T19:05:22+5:30

जिल्हा परिषद शाळा पिसवली कल्याण येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी वाईट सवयी मुलांना विचारून त्या एका कागदावर लिहून मनातील वाईट विचार व सवयी जाळून होळीचा सण साजरा केला. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात यामुळे पर्यावरणाची हानी होते.तसेच होळी सण साजरा करतांना सामाजिक भान ठेवले जात नाही.पाणी वाया घालवला जातो. केमिकल मिश्रीत रंग वापरून शारीरिक इजा पोहचवली जाते. हे होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावेत यासाठी पिसवली शाळेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजूबाजूचा कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी तयार केली.

Piswali school kids have thought bad thoughts of Holi | पिसवली शाळेतील मुलांनी केली वाईट विचारांची होळी

मुख्याध्यापक अजय पाटील यांनी होळी सणाची विज्ञानाशी सांगड घालून माहिती दिली

Next
ठळक मुद्देशाळेच्या आजूबाजूचा कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी तयार केलीमुख्याध्यापक अजय पाटील यांनी होळी सणाची विज्ञानाशी सांगड घालून माहिती दिली

डोंबिवली: जिल्हा परिषद शाळा पिसवली कल्याण येथे नाविन्यपूर्ण पद्धतीने पारंपरिक होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी वाईट सवयी मुलांना विचारून त्या एका कागदावर लिहून मनातील वाईट विचार व सवयी जाळून होळीचा सण साजरा केला. होळी सणासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात यामुळे पर्यावरणाची हानी होते.तसेच होळी सण साजरा करतांना सामाजिक भान ठेवले जात नाही.पाणी वाया घालवला जातो. केमिकल मिश्रीत रंग वापरून शारीरिक इजा पोहचवली जाते. हे होऊ नये म्हणून लहान वयात मुलांवर योग्य आणि चांगले संस्कार व्हावेत यासाठी पिसवली शाळेत विद्यार्थ्यांनी शाळेच्या आजूबाजूचा कचरा, सुकलेला पालापाचोळा गोळा करून होळी तयार केली. त्यातच मुलांनी आपल्या मनातील वाईट विचार जाळून होळी उत्सव साजरा केला. यावेळी गावचे माजी सरपंच प्रल्हाद भोईर, शाळा सुधार समीतीचे अध्यक्ष विलास भोईर यांच्या उपस्थितीत मुलींच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.
या अगोदर शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील यांनी होळी सणाची विज्ञानाशी सांगड घालून माहिती दिली. सविता नवले यांनी इकोफ्रेंडली रंग तयार केले. महेंद्र अढांगळे यांनी पाणी बचतीचे महत्त्व सांगितले. शर्मिला गायकवाड, मंगला अंबेकर, हर्षद खंबायत, कुसुम भंगाळे, लतिका राऊत, स्मिता धबडे, स्मिता कांबळे यांनी मुलांना होळीकेची कथा तसेच या सणाचे महत्त्व आणि इकोफ्रेंडली होळी कशी खेळावी याची माहिती दिली. प्रल्हाद भोईर यांनी शुभेच्छा देऊन पारंपारिक होळीचे समाजातील महत्त्व मुलांना पटवून दिले. विलास भोईर यांनी गावागावात चालणा-या होळीपेक्षा पिसवली शाळेतील आगळया वेगळ्या होळीचे कौतुक केले. झाडे लावा, झाडे जगवा , इकोफ्रेंडली धुळवड हा संदेश यावेळी देण्यात आला. अजय पाटील यांनी नैसर्गिकपणे होळी खेळण्याची शपथ मुलांना दिली. गेली अकरा वर्षे हा नाविन्यपूर्ण पण पारंपारिक होळीचा सण पिसवली शाळेत साजरा केला जात आहे. इयत्ता पहिलीची मुलगी साक्षी शिंदे हिच्या हस्ते होळी पेटवण्यात आली.शेवटी नैसर्गिक व कोरडया रंगाने धुळवड साजरी करून मुलांनी, शिक्षक व गावक-यांसोबत आनंद लुटला. या उपक्रमाचे कौतुक गावक-यांनी व अधिका-यांनी केले आहे.

Web Title: Piswali school kids have thought bad thoughts of Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.