खेळपट्टीचे उद्या होणार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:39 AM2019-01-31T00:39:00+5:302019-01-31T00:39:11+5:30

रणजी सामने खेळवण्याचा आयुक्तांना विश्वास

The pitch will be inaugurated tomorrow | खेळपट्टीचे उद्या होणार उद्घाटन

खेळपट्टीचे उद्या होणार उद्घाटन

Next

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्र ीडा प्रेक्षागृह येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचे उद्घाटन १ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता होणार असून त्यानिमित्ताने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी तिची पाहणी करून स्वत: क्रि केट खेळून आनंद घेतला. यानिमित्त ठाण्यात पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावरील कलाकारांचे क्रि केटचे सामने या नूतनीकरण खेळपट्टीवर रंगणार आहेत.

ठाणे महापालिकेच्या वतीने अत्यंत दर्जेदार अशा स्टेडियमची निर्मिती झाली असून आयपीएलमधील काही संघ या मैदानात सराव करणार असून भविष्यात रणजी क्रि केटचे सामने या मैदानात होतील, अशा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला. यावेळी शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, क्र ीडा अधिकारी मीनल पालांडे आदी उपस्थित होते.

खेळपट्टीचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, सुभाष भोईर, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत व महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी माजी क्रि केटपटू संजय मांजरेकर, राजू कुलकर्णी तसेच मुंबई रणजी क्रिकेट संघाचे कर्णधार अभिषेक नायर उपस्थित राहतील.

हे कलाकार खेळणार
यानिमित्ताने महाराष्ट्र सेलिब्रेटी क्रि केट लीगचे अयोजन ठाणे महानगरपालिका आणि दिग्दर्शक विजू माने, आकाश पेंढारकर व संदीप जुवाटकर यांनी केले आहे. डी.बी. एंटरटेन्मेंटचे दिलीप भगत सहआयोजक आहेत. या स्पर्धेत सहा संघ असून ‘मुंबईचे मावळे’ कर्णधार संजय जाधव, ‘बाणेदार ठाणे’ कर्णधार अंकुश चौधरी, ‘कोकणचे वाघ’ कर्णधार सिद्धार्थ जाधव, ‘खतरनाक मुळशी’ कर्णधार महेश लिमये, ‘पराक्र मी पुणे’ कर्णधार सौरभ गोखले आणि ‘लढवय्ये मीडिया’ कर्णधार विनोद सातव यांचा सहभाग आहे.

Web Title: The pitch will be inaugurated tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे