खड्डे भरण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:39 AM2021-03-10T04:39:50+5:302021-03-10T04:39:50+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं २ चेलाराम दरबार समोरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्यांतून ते भरण्यात आले. ...
उल्हासनगर : कॅम्प नं २ चेलाराम दरबार समोरील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून स्थानिक नगरसेवकांच्या पाठपुराव्यांतून ते भरण्यात आले. शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली असून रस्त्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
-------------------
दुकानात चोरी
उल्हासनगर : कॅम्प नं ३ कंवाराम चौकातील एका इलेक्ट्रिकल दुकानात दोन दिवसांपूर्वी चोरट्याने चोरी केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात उघड झाले. दुकानातील साहित्यासह रोख रक्कम चोरीला गेली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
----------------------
पाण्याची गळती
उल्हासनगर : कॅम्प नं ३ फॉरवड लाईन परिसरातील मुख्य रस्त्याचे काम सुरू असून जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शहरात अनेक विभागांत पाणीटंचाई असताना दुसरीकडे पाणी वाया जात असल्याने जलवाहिनी दुरूस्तीची मागणी स्थानिकांकडून होत आहे.