कल्याण-शीळ रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावे, आमदार प्रमोद पाटील यांचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 02:14 PM2020-07-17T14:14:06+5:302020-07-17T14:16:38+5:30
कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे,नवी मुंबई कल्याण,डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी मुख्य रस्ता आहे. रोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात-येत असतात. सध्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद आहे.
डोंबिवली - सध्या कल्याण-शीळ महामार्गावर रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांसाठी काही ठिकाणी सिंगल लेन रस्ता उपलब्ध आहे. परंतु सध्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पावसाळा सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडत असून, अपघातही वाढले असल्याने पुन्हा एकदा खड्याचे बळी जाऊ नयेत यासाठी तातडीने या म्हहामार्गावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी आमदार प्रमोद पाटील यांनी एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना शुक्रवारी पत्राद्वारे केली.
कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे,नवी मुंबई कल्याण,डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथील प्रवाशांसाठी मुख्य रस्ता आहे. रोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात-येत असतात. सध्या लॉकडाऊन मुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद आहे, अशावेळी वरील सर्व परिससरात राहणाऱ्या नागरिकांना कल्याण-शीळ रस्त्यावरून वाहनाने प्रवास करण्याशिवाय कोणताही अन्य पर्याय उपलब्ध नाही. तरी त्या रस्त्याची परिस्थिती पाहता, या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजविण्याचे काम हाती घ्यावे, तसेच केलेल्या कार्यवाहीची तातडीने लेखी माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी पत्रात म्हंटले आहे.
एमएसआरडीसीच्या अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्या रस्त्याचे सीसी काम सुरू असून पावसामुळे ते संथगतीने पुढे सरकत आहे. 21 मीटर लांबीच्या स्त्यामध्ये एकूण 8 लाईन्स पैकी 2 लाईन्सचे सुमारे 18 किमीपर्यंत सीसी काम।झाले आहे. बाकी लाईन्सचे काम आगामी काळात हाती घेण्यात येणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे चार महिने कामगारांच्या उपलब्धतेची समस्या होती, ती आता हळूहळू पुढे सुटत असून लवकरच त्या रस्त्यावरील प्रलंबित कामाना वेग मिळेल. पत्री पूल दरम्यान असलेले।खड्डे चिखल।खड्यानी बुजवण्यात येत असून त्या बद्दल आमदार पाटील यांनी नाराजी व्यक्त।केली. ही थुकपट्टीची कामे असून योग्य नसल्याचे ते म्हणाले. अभियंत्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, सब घोडे 12 टके अशी टीकाही त्यांनी केली.