लोकनागरी-एमआयडीसी रस्त्यावर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:42 AM2021-07-28T04:42:04+5:302021-07-28T04:42:04+5:30

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. याकडे अंबरनाथ पालिका ...

Pits on Loknagari-MIDC road | लोकनागरी-एमआयडीसी रस्त्यावर खड्डेच खड्डे

लोकनागरी-एमआयडीसी रस्त्यावर खड्डेच खड्डे

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून एमआयडीसीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. याकडे अंबरनाथ पालिका प्रशासनाने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अंबरनाथ शहराला लागून आनंदनगर एमआयडीसी ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत असलेल्या एक हजारपेक्षा जास्त कारखान्यांमध्ये दररोज हजारो कामगार ये-जा करतात. मात्र, या कामगारांना येण्या-जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. लोकनगरी ते पेट्रोल पंपापर्यंतच्या पट्ट्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मागच्या वर्षी कोरोनाच्या नावाखाली शहरातील इतर कुठल्याही समस्येकडे लक्ष न दिलेल्या अंबरनाथ पालिकेने या वर्षीही या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. अंबरनाथ पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे या प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घेऊन किमान या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी माफक अपेक्षा या ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या कामगारांनी आणि रिक्षाचालकांनी केली आहे.

---------------

फोटो आहे

-----------------------------------------------------

Web Title: Pits on Loknagari-MIDC road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.