भिवंडीतील पडघ्यात गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व स्वागताचे नियोजन
By नितीन पंडित | Published: February 9, 2023 06:02 PM2023-02-09T18:02:05+5:302023-02-09T18:02:27+5:30
थायलंड येथील बौध्द भिक्खू संघाच्या वतीने उपस्थित नागरिकांना धम्मदेसना मिळणार आहे.
भिवंडी- तालुक्यातील पडघा विभागात प्रथमच तथागत भगवान गौतम बुध्द अस्थिधातू कलश वंदन व आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खु संघ थायलंड यांची भव्य धम्मपद यात्रा स्वागत समारंभ रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता तालुक्यातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांच्या वतीने पडघा टोलनाका जवळील गोपाळास हॉटेल, मुंबई-नाशिक हायवे येथे होणार आहे.
यावेळी पडघा विभागातील नागरिकांना तथागत भगवान बुध्द यांच्या अस्थिधातू कलशाचे वंदन करायला मिळणार असून यावेळी थायलंड येथील ११० पुजनीय बौध्द भिक्खू संघ, धम्मपद यात्रेचे स्वागत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांचा वतीने होणार आहे.
यावेळी थायलंड येथील बौध्द भिक्खू संघाच्या वतीने उपस्थित नागरिकांना धम्मदेसना मिळणार आहे. पडघा व भिवंडी परिसरातील नागरिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव पडघे विभाग यांचा वतीने करण्यात आले आहे.