भिवपुरी जंगलात "बाण हायकर्स"ची वृक्षारोपण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:27 AM2021-06-24T04:27:09+5:302021-06-24T04:27:09+5:30

ठाणे : गेल्या चार वर्षांपासून भिवपुरी येथील जंगलामध्ये ''बाण हायकर्स''तर्फे वृक्षारोपण केले जाते. यावर्षी या मोहिमेंतर्गंत २०० झाडांचे रोपण ...

Plantation campaign of "Arrow Hikers" in Bhivapuri forest | भिवपुरी जंगलात "बाण हायकर्स"ची वृक्षारोपण मोहीम

भिवपुरी जंगलात "बाण हायकर्स"ची वृक्षारोपण मोहीम

Next

ठाणे : गेल्या चार वर्षांपासून भिवपुरी येथील जंगलामध्ये ''बाण हायकर्स''तर्फे वृक्षारोपण केले जाते. यावर्षी या मोहिमेंतर्गंत २०० झाडांचे रोपण बाणच्या सदस्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने केले. या मोहिमेत बाण हायकर्सचे ३० सदस्य सहभागी झाले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लावलेल्या झाडांना उन्हाळ्यात पाणी देण्याची जबाबदारीदेखील ''बाण''ने घेतली आहे.

भिवपुरी येथील माळरानावर पाच फुटांची रोपे आणण्याचे मोठे आव्हान होते. ते गावातील तरुणांच्या सहभागातून पेलणे शक्य झाले. या माळरानावर कडुलिंब, पिंपळ, गुलमोहर, सीसम, कांचन, कदंब, अशोक, अर्जुन, जांभूळ, आंबा इत्यादी झाडे लावण्यात आली. भविष्यात या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारीदेखील बाण हायकर्सने घेतली आहे. यामध्ये झाडांभोवती कुंपण घालणे, त्यांना वेळोवेळी खत देणे, याशिवाय अनेक कामे भविष्यात करायची आहेत.

---------------

Web Title: Plantation campaign of "Arrow Hikers" in Bhivapuri forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.