भिवंडीतील उद्यानात मियांवाकी पद्धतीने पाच हजार वृक्षांची लागवड
By नितीन पंडित | Published: April 18, 2024 05:56 PM2024-04-18T17:56:24+5:302024-04-18T17:57:16+5:30
भिवंडी शहरातील कामतघर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी मेकिंग द डिफरन्स या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ५ हजार वृक्षांची गुरुवारी लागवड करण्यात आली.
भिवंडी: शहरात काँक्रीटची जंगले उभी राहत असतानाच जपान मधील मियांवाकी पद्धतीनं घनदाट वन जंगल शहरात उभी करण्याची पद्धत अवलंबली जात आहे.ज्यामध्ये कमीत कमी जागे मध्ये अधिकाधिक वृक्ष लागवड करण्यात येते. भिवंडी शहरातील कामतघर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान या ठिकाणी मेकिंग द डिफरन्स या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ५ हजार वृक्षांची गुरुवारी लागवड करण्यात आली.
सध्या उष्णेतेची तीव्रता वाढली असून मे महिन्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार आहे. अशा वेळी आपणास निसर्गाचा समतोल साधणाऱ्या वृक्षांची आठवण येते.त्यासाठी जपान मधील अकिरा मियावकी या संकल्पनेचा वापर करून घनवन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. या उद्यानात सुपारी, अशोका, पेरू, कामिनी, जास्वंद, कणेर, सोनचाफा, बहावा, कवट, पारिजात, बेल अशा विविध ५५ प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली असून या उद्यानाची देखभाल करण्यासाठी मेकिंग द डिफरन्स ही संस्था भिवंडी महानगर पालिका प्रशासनास सहकार्य करणार असून या वर्षभरात ७५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प संस्थेचा आहे, त्यापैकी आता पर्यंत संस्थेच्या माध्यमातून विविध ठिकाणी २५ हजार वृक्ष लागवड केली गेली असल्याची माहिती मेकिंग द डिफरन्स या संस्थेचे पदाधिकारी दीपक विश्वकर्मा यांनी दिली आहे.