उल्हासनगरातील पशुपती इमारतीचे प्लास्टर पडले, दुरुस्तीच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:51 AM2021-09-16T04:51:03+5:302021-09-16T04:51:03+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-२ राम मालिशवाला परिसरातील वाणिज्य वापरातील पशुपती इमारतीचे प्लास्टर दुपारी पडल्याने एकच खळबळ उडाली. सहायक आयुक्त ...
उल्हासनगर : कॅम्प नं-२ राम मालिशवाला परिसरातील वाणिज्य वापरातील पशुपती इमारतीचे प्लास्टर दुपारी पडल्याने एकच खळबळ उडाली. सहायक आयुक्त गणेश शिंपी, अनिल खतुरानी यांनी इमारतीची पाहणी करून दुरुस्तीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
पशुपती ही तळमजला अधिक तीनमजली वाणिज्य वापराची इमारत आहे. बुधवारी दुपारी इमारतीचे प्लास्टर पडल्याने, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून, जुन्या इमारतींमधील हजारो नागरिक कुटुंबासह जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
शहरात दोन महिन्यांपूर्वी मोहिनी पॅलेस व साई पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबाला शासनाने जाहीर केलेली मदत अद्याप मिळाली नसल्याने, नाराजी व्यक्त होत आहे. इमारतीचे प्लास्टर कोसळण्याचे सत्र सुरू असून शेकडो जण बेघर झाले आहेत.
...........
वाचली