प्लॅस्टिकबंदी : ठाण्यात पहिल्याच दिवशी लाखो रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:08 AM2018-06-24T02:08:28+5:302018-06-24T02:08:32+5:30
प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ््या महापालिकांमधील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारुन हजारो रुपयांचा दंड वसूल केला.
ठाणे : प्लॅस्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ््या महापालिकांमधील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारुन हजारो रुपयांचा दंड वसूल केला. पहिल्या दिवशी प्लॅस्टिक वस्तूंची विक्री करणाºया दुकानदारांना धारेवर धरताना ग्राहकांना केवळ समज देऊन सोडून देण्यात आले. मात्र सोमवारपासून सर्वसामान्यांचीही गय केली जाणार नाही, असे महापालिकांनी स्पष्ट केले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर येथे कारवाई करुन दंड वसूल केल्याने दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रात महापालिकेच्या विशेष पथकाने प्लॅस्टिकचा वापर करणाºयांच्या विरोधात कारवाई केली. प्रदूषण विभागाच्या प्रमुख मनिषा प्रधान यांच्या नेतृत्वाखालील ५० जणांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानक, पोखरण रोड, मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट, गावंदेवी आदी ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. भाजी मार्केटमधून ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. संपूर्ण शहरात १०० पेक्षा जास्त आस्थापनांवर कारवाई करुन ९५ हजारांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. २५०० किलो प्लास्टिक जप्त केले आहे.
ठाणे महापालिकेने १० प्रभाग समिती निहाय १० पथकांची स्थापना केली असून या प्रत्येक टीममध्ये स्वच्छता निरीक्षकाचा समावेश आहे. ठाणे रेल्वे स्थानक आणि मार्केट परिसरावर बारीक लक्ष असणार आहे, असे प्रधान यांनी सांगितले.
मार्केटमधील ज्या दुकानांवर धाडी घातल्या त्यांच्याकडे अडीच ते तीन किलोपेक्षा जास्त प्लॅस्टिक मिळाले. तीन दुकानदारांकडून प्रत्येकी ५ हजारांप्रमाणे १५ हजार रु पये दंड वसूल करण्यात आला. नौपाडा, गावंदेवी या परिसरातील जवळपास सर्वच छोटी मोठी दुकाने आणि फेरीवाल्यांची तपासणी करण्यात आली. रविवारपासून शहरातील सर्वच दुकानदार आणि विक्रेत्यांकडून दंड आकाराला जाणार असल्याची माहिती पालिकेने दिली.
कारवाईची वार्ता पसरताच पिशव्या लपवल्या
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेने प्लॅस्टिक विक्री करणाºया १० दुकानदारांवर कारवाई करुन ५० हजारांची दंड वसुली केली.
पोलीस स्टेशन समोरील राहुल मार्टमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याने उपमुख्याधिकारी दीपक चव्हाण आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सुहास सावंत यांच्या उपस्थितीत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्यानंतर शहरातील इतर दुकानांवरही कारवाई करण्यात आली.