मुरबाडमध्ये प्लास्टिक खुर्ची कंपनीला भीषण आग, एमआयडीसीमध्ये आगीचे तांडव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 11:24 PM2021-11-07T23:24:49+5:302021-11-07T23:25:22+5:30
या आगीत मोठ्याप्रमाणावर मालाचे नुकसान झालेले दिसून आले. तर, अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
ठाणे/मुरबाड : मुरबाड एमआयडीसीतील तहसील कार्यालयालगत असलेल्या प्लास्टिक खुर्ची कंपनीला भीषण अग लागली असून मुरबाड एमआयडीसीमध्ये आग लागण्याच्या मालिका थांबतील केव्हा? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. यापूर्वी बोंबे कुलर, टेक्नोक्राफ्ट,मोरेश्वर प्लास्टिक कंपन्या आदी कंपन्यांना आग लागल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर आज 8 वाजेच्या सुमारास मुरबाड एमआयडीसीमधील तहसील कार्यालयाजवळील प्लास्टिक खुर्ची कंपनीला भीषण आग लागली.
या आगीत मोठ्याप्रमाणावर मालाचे नुकसान झालेले दिसून आले. तर, अग्निशमन दलाने युद्ध पातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
मुरबाड शहरातील तहसील कार्यालयालगत प्लास्टिक खुर्ची कंपनीला आग लागल्याने नागरिकांनमध्ये चर्चेला उधाण आले होते. प्लास्टिक खुर्ची कंपनीला आज 8 च्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने धुरांचे उंचच उंच डोंब दुरूनही दिसत होते. तर आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने अथक प्रयत्न केले.