‘नॅब’ मध्ये प्लास्टिक प्रक्रिया उद्योग होणार सुरु, दृष्टिहीनांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 02:15 AM2020-06-22T02:15:13+5:302020-06-22T02:15:17+5:30

औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न सुटून उद्योगांना प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी कच्चा माल मिळणार आहे.

The plastic processing industry will start in NAB, providing employment to the blind | ‘नॅब’ मध्ये प्लास्टिक प्रक्रिया उद्योग होणार सुरु, दृष्टिहीनांना रोजगार

‘नॅब’ मध्ये प्लास्टिक प्रक्रिया उद्योग होणार सुरु, दृष्टिहीनांना रोजगार

Next

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये असलेल्या ‘नॅब’ संस्थेमध्ये स्थानिक उद्योजकांची संघटना असलेल्या ‘आमा’ च्या सहकार्याने प्लास्टिक प्रक्रिया उद्योग सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे अंध बांधवांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील प्लास्टिक कचऱ्याचा प्रश्न सुटून उद्योगांना प्लास्टिकचा पुनर्वापर करण्यासाठी कच्चा माल मिळणार आहे.
१९८५ मध्ये राज्य सरकारने अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये अंध बांधवांना अभियांत्रिकी उद्योगात आवश्यक असणारी कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी ‘नॅब’च्या सहकार्याने पॉलिटेक्निक सुरू करण्यात आले. या केंद्रात राज्यातील ४० अंध बांधवांच्या निवासी प्रशिक्षणाची सोय आह. आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये लहान-मोठे एक हजारांहून अधिक कारखाने आहेत. तिथून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचºयात टाकले जाते. या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणारा प्रकल्प नॅब पॉलिटेक्निकच्या सहकार्याने ‘आमा’ संघटना राबविणार आहे. प्लास्टिकच्या पुनर्वापरामुळे शहरातील कचरा व्यवस्थापनास हातभार लागेल, अंध बांधवांना रोजगार मिळेल त्याचबरोबर शहरातील उद्योजकांना प्लास्टिकचा कच्चा माल लागतो तो याच प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्याचा विश्वास ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष आणि नॅब पॉलिटेक्निकचे स्थानिक कमिटीचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी व्यक्त केला. ‘नॅब’च्या आवारात अंध प्रशिक्षणार्थी बनवत असलेल्या विविध वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री केंद्रही उभारण्यात येणार असल्याचे तायडे यांनी सांगितले.

Web Title: The plastic processing industry will start in NAB, providing employment to the blind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.