डम्पिंगवर प्लास्टिकचे प्रमाण ५० टक्क्यांनी घटले, ठाणे महानगरपालिकेचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 01:41 AM2019-11-29T01:41:39+5:302019-11-29T01:42:27+5:30
ठाणे महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईमुळे ठाण्यातून प्लास्टिक जवळजवळ हद्दपार होत असल्याचे चित्र असून त्याच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने पावले उचलली आहेत.
ठाणे : ठाणे महापालिकेने प्लास्टिकबंदीबाबत केलेल्या कारवाईमुळे ठाण्यातून प्लास्टिक जवळजवळ हद्दपार होत असल्याचे चित्र असून त्याच्या आणखी प्रभावी अंमलबजावणीसाठी पालिकेने पावले उचलली आहेत. गेल्या काही महिन्यांत मल्टीलेअर प्लास्टिकनिर्मितीचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन सर्वाधिक याच प्रकारचे प्लास्टिक हे डम्पिंगवर जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी पालिकेने केलेल्या उपाययोजनांनंतर अशा प्रकारचे ५० टक्के प्लास्टिक डम्पिंगवर जाणे बंद झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. याशिवाय, विविध प्रकारच्या प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासदेखील करण्यात येणार असून यामध्ये प्लास्टिकवर प्रक्रि या करणाऱ्या अनेक कंपन्यांबरोबर पालिकेने समन्वय साधला आहे.
प्लास्टिक संकलनासाठी पालिकेने चार विशेष गाड्यांची व्यवस्था केली असून प्रत्येक प्रभागात १५ दिवसांनी या माध्यमातून प्लास्टिक संकलन केले जाते. प्लास्टिकबंदी ही पालिका स्तरावर न राहता प्लास्टिक संकलन करणाºया आणि त्यासंदर्भात जनजागृती करणाºया विविध प्रकारच्या सामाजिक संस्था आणि संकलित केलेल्या प्लास्टिकवर प्रोसेसिंग करणाºया विविध कंपन्यांना प्लास्टिकबंदीच्या मोहिमेत सहभागी करून घेण्याचे काम पालिका प्रशासनाने केले असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण विभागाने दिली. पालिकेने वारंवार केलेल्या कारवायांमुळे ठाण्यात प्लास्टिकबंदीची मोहीम काही प्रमाणात यशस्वी झाली आहे. मात्र, केवळ एकाच प्रकारचे प्लास्टिक संकलित होत नसल्याने प्रत्येक प्रकारच्या प्लास्टिकचे विघटन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येऊ शकतो, अशी संकल्पना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मांडली. त्यानुसार, पालिका स्तरावरदेखील यासंदर्भात काम सुरू केले आहे. मात्र, यामध्ये मल्टीलेअर प्लास्टिकचे प्रमाण जास्त असल्याने ते कमी करण्यासाठी पालिकास्तरावर प्रयत्न केला असल्याने अशा प्रकारचे प्लास्टिकचे विघटन करण्यास कठीण असल्याने हेच प्रमाण कमी केले पालिकेने स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे प्लास्टिक संकलनासाठी चार विशेष गाड्यांची सुविधा केली असून नौपाडा, वर्तकनगर आणि कळव्यात लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती या विभागाने दिली. यापुढे ही मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे प्रदूषण विभागाने स्पष्ट केले आहे.
२०१९ मध्ये ५.७ टन प्लास्टिक जप्त
दरम्यान, महापालिकेने केलेल्या कारवाईत २०१९ मध्ये ५.७ टन प्लास्टिक जप्त करून एक लाख ९० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिकप्रमाणे थर्माकोलपासून बनविण्यात येणारी ताटे, वाट्या, कप, ग्लास यांच्या वापराचे प्रमाणही जास्त आहे. या सर्व वस्तू विघटन न होणाºया असून पर्यावरणास हानिकारक आहेत. त्यांची विक्र ी आणि वापर दोन्ही बेकायदा असून त्यांचा वापर करणाऱ्यांवर दंड आकारण्यात येणार आहे. यामध्ये पहिल्यांदा आढळल्यास पाच हजार दंड, दुसºयांदा आढळल्यास १० हजार आणि तिसºयांदा आढळल्यास २५ हजार तसेच तीन महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.