डम्पिंग ग्राउंडवरील प्लास्टिक कचरा होणार वेगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 01:48 AM2019-04-12T01:48:00+5:302019-04-12T01:48:06+5:30
उल्हासनगर पालिकेचा उपक्रम : ४१ कचरावेचक महिलांना मंजुरी, रोजगाराची मिळाली संधी
- सदानंद नाईक
उल्हासनगर : डम्पिंग ग्राउंडवरील प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोल वेगळे करण्यात पालिकेला यश आले असून आगीच्या घटनेत घट झाली आहे. प्लास्टिक पिशव्या वेगळ्या करण्यासाठी ४१ कचरावेचक महिलांना परवानगी दिली असून प्लास्टिक पिशव्यांतून त्यांना रोजगार मिळाला आहे.
उल्हासनगर डम्पिंग ग्राउंडला आग लागून परिसरात धूर पसरत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांची होती. त्यासाठी विविध योजना राबवल्यानंतरही पालिकेला यश आले नाही. प्लास्टिक पिशव्यांमुळे आग लागत असल्याचे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व नगरसेवकांच्या लक्षात आले. डम्पिंगवर टाकण्यात आलेल्या कचऱ्यातून प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोल वेगळे करण्याची संकल्पना पुढे आली. त्यासाठी ४१ कचरावेचक महिलांची मदत घेण्यात आली असून त्यांना डम्पिंगवरील कचºयातून प्लास्टिक वेगळे करण्यास परवानगी दिली. नागरिकांच्या आरोग्यहिताचे काम करणाºया कचरा वेचणाºया महिलांना आरोग्यविषयक सुविधा व विशिष्ट निधी देण्याची मागणी होत आहे.
कचरा वेचणाºया महिला डम्पिंगवरील प्लास्टिक पिशव्या वेगळ्या करून त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. प्लास्टिक वेगळे केल्याने डम्पिंगवरील कचºयाला लागणाºया आगीच्या प्रकारात घट झाल्याची माहिती पवार यांनी दिली. यापूर्वी डम्पिंगला आग लावून परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. कचºयातून प्लास्टिक वेगळे केल्याने, महिलांना रोजगार मिळून आग लागण्याच्या घटनेतही घट झाली. कचरावेचक महिलांना पालिकेने इतर सुविधा दिल्यास डम्पिंगवरील कचºयाचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच कचºयाचे वर्गीकरण झाल्यास कचºयाच्या प्रमाणात घट होण्याचे मतही पवार यांनी व्यक्त केले.
सपाटीकरणावर साडेतीन कोटींचा खर्च
डम्पिंग ग्राउंडवरील कचºयाच्या सपाटीकरणावर पालिका तब्बल साडेतीन कोटी खर्च करते. तसेच वाहने कालबाह्य झाल्याचा आरोप होऊनही महापालिका त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. कचरा उचलण्यावर रोज साडेचार लाख तर वर्षाला १६ कोटींचा खर्च होत आहे. तसेच डेब्रिज उचण्यावरही दोन कोटींचा खर्च केला जात असून इतर खर्च वेगळा असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.