National Sports Day : खेळाडू गुणवत्तापूर्ण, पण सुविधाच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 04:34 AM2018-08-29T04:34:35+5:302018-08-29T10:57:27+5:30

मैदानांची संख्या वाढल्यास चांगले क्रिकेटपटू घडतील

Players are quality, but there are no features | National Sports Day : खेळाडू गुणवत्तापूर्ण, पण सुविधाच नाहीत

National Sports Day : खेळाडू गुणवत्तापूर्ण, पण सुविधाच नाहीत

Next

ठाणे - क्रिकेटपटूंसाठी ठाणे शहरात कमी सुविधा आहेत. गेल्या काही वर्षांत शहराची लोकसंख्या दहापट वाढली. त्यातुलनेत मैदानांची संख्या मात्र घटत गेली. क्रिकेट खेळण्यासाठी येथे दादोजी कोंडदेव स्टेडियम आणि सेंट्रल मैदान ही दोनच मैदाने आहेत. मैदानांच्या अभावामुळे ठाण्यातील क्रिकेट खेळाडूंना सरावासाठी मुंबईला जावे असल्याची खंत क्रिकेट प्रशिक्षक दर्शन भोईर यांनी व्यक्त केली.

ठाण्यातील अनेक क्रिकेटपटूंनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. शहरातील २० ते २५ टक्के क्रिकेटपटूंना सरावासाठी मुंबईचा रस्ता धरावा लागतो. क्रिकेट खेळण्यासाठी महत्त्वाची सुविधा लागते ती चांगल्या मैदानांची आणि त्याचाच अभाव या शहरात आहे. मुंबईला जावे लागत असल्यामुळे या मुलांचा वेळ, पैसा, ऊर्जा खर्च होते. प्रवासातच दोन ते तीन तास वाया जातात. हाच वेळ सरावासाठी खर्ची पडला तर त्यांना अधिक फायदा होईल. शहरातील क्रिकेटर्समध्ये प्रचंड गुणवत्ता आहेत. शिकविण्यासाठी उत्तम प्रशिक्षकही आहेत; परंतु केवळ मैदानांमुळे क्रिकेटपटूंना शहराबाहेर जावे लागते. प्रशिक्षकही शिकविण्यासाठी शहराबाहेर जातात. केवळ क्रिकेटसाठी नाही तर दुसऱ्या खेळांसाठीही मैदाने झाली पाहिजे. काही वर्षांपूर्वी घोडबंदर रोडवर मैदानांसाठी वाव होता. परंतु त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. ठाण्यातील अनेक क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी बजावली आहे. १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत ठाण्याच्या अखिल हेरवाडकरने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. शहरात मैदानांची संख्या वाढली, तर खेळाडूंचा पैसा, वेळ आणि ऊर्जा बचत होईल.

न्य खेळांच्या तुलनेत कमी खर्चीक, वेगवान आणि उत्साही खेळ म्हणून खो-खो ओळखला जातो. ठाणे जिल्ह्यात खो-खोचे २२ संघ आहेत. या संघांचे अनेक खेळाडू राष्टÑीय स्तरावर महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करतात. गेल्या काही वर्षांमध्ये खो-खोची गुणवत्ता वाढली. मात्र हे खेळाडू आणि त्यांचे संघ प्राथमिक सोयी-सुविधांपासून अद्यापही वंचित आहेत. या खेळाचा अधिकाधिक प्रसार करायचा असेल तर या खेळाच्या सोयीबाबत विशिष्ट धोरण ठरवण्याची आणि ते अमलात आणण्याची गरज असल्याचे मत बँक स्पोर्ट्स बोर्डचे कार्यकारिणी सदस्य आणि ठाणेकर खेळाडूंचे मार्गदर्शक सचिन ठाणेकर यांनी व्यक्त केले.
पक्के आणि राखीव मिळून १२ खेळाडू आणि ३६ मिनिटांचा असलेला खेळ म्हणजे खो-खो. ठाण्यात अंदाजे ३० वर्षांपूर्वी ठाणे जिल्हा खो-खो संघटनेची स्थापना झाली. ग्रामीण व शहरी मिळून खो-खोचे सुमारे २२ संघ आहेत. त्याव्यतिरिक्त काही शाळांचे वैयक्तिक संघही आहेत. पुरूषांमध्ये किशोर, कुमार आणि पुरूष असे तीन गट, तर महिलांमध्ये किशोरी, कुमारी आणि महिला असे गट असतात. ठाण्यातील आनंद भारती समाज, हनुमान व्यायामशाळा, समर क्रीडा मंडळ, राज क्रीडा मंडळ इत्यादी संघ खूप जुने आहेत. कमी खर्चीक आणि उत्साहवर्धक खेळ असल्याने यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यातही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करमणुकीची साधने कमी असतात. त्यांना इतर खेळांच्या सरावाचा खर्च परवडत नाही. त्यामुळे खो-खोसारख्या खेळामध्ये मुले सहभागी होतात. त्यांना शाळेचे पाठबळ मिळते. नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथसह इतर ग्रामीण भागातील खेळाडूंनी राष्टÑीय स्तरावर प्रतिनिधित्व करून उत्तम कामगिरी केली. मात्र हा खेळ आणि खेळाडूंना सोयीसुविधा देण्याबाबत शासन उदासीन दिसते. या खेळासाठी मैदाने, त्यावर माती, पाणी, खेळाडूंसाठी स्वच्छतागृहे आणि सरावासाठी वीज या प्राथमिक गरजा आहेत. मात्र त्याही सर्व संघांना उपलब्ध होत नाहीत. काही संस्थांची स्वत:ची मैदाने आणि पुरेशा सोयी आहेत. मात्र इतर संस्थांना कोणतेही पाठबळ नसते. महापालिका शाळांची मैदाने त्यांना उपलब्ध व्हावीत. माती, पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय करण्यासाठी पालिकेने धोरण ठरवणे गरजेचे आहे.
खो-खोला व्यवस्थेचे पाठबळ मिळाले तर ठाणेकर खेळाडूंचा प्रगतीरथ अधिक वेगवान होईल, यात शंका नाही. इतर खेळांप्रमाणे खो-खो खेळणाºया खेळाडूंना विविध आस्थापनांमध्ये नोकºया मिळाल्या पाहिजे, तर व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून खो-खोकडे अधिकाधिक खेळाडू आकर्षित होतील आणि नवनवीन संघ तयार होतील, असा विश्वास ठाणेकर यांनी व्यक्त केला.
सचिन ठाणेकर यांची व्यथा

कबड्डीपटूंसाठी मॅटची वानवा
णे जिल्ह्याने राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संघासाठी अनेक कबड्डीपटू दिलेत. राष्ट्रीय स्तरावर गेल्यानंतर लाल मातीतला हा खेळ मॅटवर खेळला जाऊ लागला. ठाण्याच्या ग्रामीण भागात उत्कृष्ट कबड्डीपटू तयार झाले असले तरी त्यांना मोठ्या स्पर्धेत खेळण्यासाठी मॅटवर सराव करायला मिळत नाही. ठाणे जिल्ह्यात खेळाडूंसाठी ही सुविधाच उपलब्ध नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. सुविधा मिळाल्यास ठाण्यातील कबड्डीपटू राष्ट्रीयस्तरावरही चांगली कामगिरी बजावतील, असा विश्वास प्रसिध्द कबड्डी प्रशिक्षक राजेंद्र मोनणकर यांनी व्यक्त केला.

राजेंद्र मोनणकर हे ठाणे शहरात तरुण कबड्डीपटूंना घडविण्यासाठी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत आहेत. कबड्डीच्या भवितव्याविषयी बोलताना त्यांनी जिल्ह्यात तयार होणाºया कबड्डीपटूंवर विश्वास व्यक्त केला. हा खेळ व्यावसायिक स्वरूपाचा झाला आहे. त्यामुळे कबड्डीपटूंना संधी उपलब्ध होत आहेत. प्रो कबड्डीमुळे कबड्डीचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. कबड्डीमध्ये करिअर घडवण्यासाठी खेळाडू पुढे येत आहेत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात कबड्डीला जास्त वाव आहे. शहरातील खेळाडू सहजासहजी कबड्डीकडे वळत नाहीत. ग्रामीण भागात शिक्षणासोबत विद्यार्थी कबड्डीचेही प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात हा खेळ आजही टिकून आहे.

पावसाळ्यातही सराव हवा : ठाणे जिल्ह्यात ५५० हून जास्त नोंदणीकृत कबड्डी संघ असतानाही प्रशिक्षणासाठी मॅट उपलब्ध नाही. याशिवाय मॅटवर कबड्डी खेळण्यासाठी लागणारी किट खर्चीक असते. त्यामुळेही मॅटपर्यंत खेळाडू पोहोचू शकत नाहीत. मॅटवर कबड्डी खेळण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा असतो. त्यामुळे खेळाडूंच्या फिटनेसकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मॅटची सुविधा गरजेची आहे. पावसाळ्यातही सराव करता येईल, अशी जागादेखील उपलब्ध होणे गरजेचे आहे. ठाणे जिल्ह्यातील संघांना मॅट खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने पुढाकार घेऊन मॅटची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. ठाण्यात सुविधा उपलब्ध नसल्याने खेळाडूंना सरावासाठी मुंबईला जावे लागते. त्यामध्ये त्यांचा वेळ नाहक खर्च होत असल्याचे राजेंद्र मोनणकर यांनी सांगितले.

ठाण्यातील खेळाडूंमध्ये गुणवत्तेची कमी नाही; मात्र या गुणवत्तेला उभारी देण्यासाठी मूलभूत सुविधाच उपलब्ध नाहीत. ठाण्यात सुविधांची वानवा असल्याने क्रीडा क्षेत्राच्या आलेखात घसरण झाल्याची खंत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त केली. यानिमित्ताने वेगवेगळ्या खेळाच्या प्रशिक्षकांनी क्रीडा क्षेत्रातील ठाण्याच्या कामगिरीचा ऊहापोह ‘लोकमत’कडे केला. ठाण्यात चांगले अ‍ॅथलेटस घडू शकतात; मात्र त्यांच्यासाठी सुविधांचा अभाव आहे. कबड्डीसारख्या मैदानी खेळाचे उत्कृष्ट खेळाडू ठाण्याच्या ग्रामीण भागात आहेत. लाल मातीमध्ये तयार झालेले हेच खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्यानंतर मॅटवर कबड्डी खेळू शकत नाहीत. त्यासाठी स्थानिक स्तरावर मॅटची सुविधा गरजेची आहे. हीच परिस्थिती खो-खो आणि क्रिकेटची आहे.
 

Web Title: Players are quality, but there are no features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे