दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर होणार खेळाचे मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 10:57 PM2019-11-19T22:57:04+5:302019-11-19T22:57:13+5:30

प्रस्तावातील त्रुटींमुळे झाला संभ्रम; महापालिकेचे स्पष्टीकरण

The playground will take place at the site of the lamp's dumping ground | दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर होणार खेळाचे मैदान

दिव्यातील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर होणार खेळाचे मैदान

googlenewsNext

ठाणे : ठाणे महापालिकेने दिव्यातील बेकायदा डम्पिंग ग्राउंड अधिकृत करण्यासाठीचा आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव मंगळवारी महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला. त्यात ते कायमचे बंद केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. खाजगी जागेवर असल्याने ते बंद करण्यासाठीच हा फेरबदलाचा प्रस्ताव आणल्याचे स्पष्ट केले आहे. याठिकाणी यापूर्वी जशी जागा होती, तशीच जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतु, त्यासाठी नियमानुसार सोपस्कार करणे गरजेचे असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले.

महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्याठिकाणी खेळाचे मैदान किंवा उद्यान विकसित करण्याचा उद्देश आहे. त्यासाठीच आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन असा उल्लेख झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. वास्तविक पाहता महापालिकेच्या शहर विकास विभागाकडून हा प्रस्ताव आल्याने त्यात त्याचा उल्लेख आल्याने तो झाल्याचे पालिकेने मान्य केले आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन ऐवजी महापालिका पर्पज असे आरक्षण करण्यात येणार असून तशाप्रकारचा बदल प्रस्तावामध्ये प्रशासनाकडून केला जाणार आहे. कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची नैतिक जबाबदारी, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेली नोटीस या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानांतर्गत जुन्या कचºयाची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी १०० गुण असतात. त्यामुळे दिवा कचराभूमीवर जुन्या कचºयाची शास्त्रोक्त विल्हेवाट लावली नाही तर स्वच्छ सर्व्हेक्षणातील गुण कमी होऊन शहराचा क्र मांक खालावेल. या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव तयार केल्याचे महापालिकेचे उपायुक्त मनिष जोशी यांनी स्पष्ट केले. 

डिसेंबर २0 पर्यंत पूर्ण करणार प्रकल्प
दिवा कचराभूमीवर आतापर्यंत २३ लाख मेट्रिक टन कचरा टाकण्यात आला असून त्याची बायोमॉनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. कचºयामध्ये मिथेन आणि लिचेड असतो. यामुळे कचºयाला आग लागणे तसेच दुर्गंधी पसरते. या कचºयामधील प्रत्येक घटकांचे वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. त्यानंतर त्याठिकाणी ती जागा पूर्वीप्रमाणेच अन्य वापरासाठी खुली केली जाते. यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे. तसेच डायघर येथील कचºयाची विल्हेवाट लावून त्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प राबविला जाणार आहे. त्याचे काम सुरू असून तो डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचेही जोशी यांनी स्पष्ट केले.

Web Title: The playground will take place at the site of the lamp's dumping ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dumpingकचरा