ठाण्यात पालेभाज्यांचे दर निम्म्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:51 AM2019-07-18T00:51:09+5:302019-07-18T00:51:17+5:30
दहा दिवसांपूर्वी द्विशतक गाठलेल्या कोथिंबिरीचे दर आता शंभरीच्या आत आले आहेत.
ठाणे : दहा दिवसांपूर्वी द्विशतक गाठलेल्या कोथिंबिरीचे दर आता शंभरीच्या आत आले आहेत. लातूर, बेळगाव, पुणे याठिकाणाहून कोथिंबिरीची आवक सुरू झाल्याने सध्या नाशिकच्या कोथिंबिरीकडे विक्रेत्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे सध्या किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपयांनी कोथिंबीर विकली
जात असून इतर पालेभाल्यांचे दर निम्म्यावर आल्याचे भाजीविक्रेत्यांनी सांगितले.
ठाण्याच्या बाजारात कोथिंबीर २५० रुपये जुडीने मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. परंतु लातूर, बेळगाव, पुणे या ठिकाणाहून येणारी कोथिंबीर ही स्वस्त असून लातूर आणि पुण्याची कोथिंबीर ४० ते ५० रुपये जुडी, तर बेळगावहून येणाऱ्या कोथिंबिरीचे दर ४० रुपये असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तसेच, पावसामुळे वाहतुकीतच भाज्या सडत असल्याने इतर पालेभाज्यांचे दरही दुप्पट झाले होते. परंतु, कमी झालेल्या पावसामुळे भाज्या सडत नसल्याने या भाज्यांचे दर आता गडगडले असल्याचे भाजीविक्रेते निवृत्ती क्षीरसागर यांनी लोकमतला सांगितले. भाव कमी झाल्याने ठाणेकर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे ते म्हणाले.
>पालेभाज्यांची नावे आधीचे दर आताचे दर
कोथिंबीर २०० ते २५० रु. जुडी ४० ते ५० रु.
मेथी ४० रु. जुडी २० ते २५ रु.
पालक १५ ते २० रु. जुडी १० रु.
चवळी २० रु. जुडी १५ रु.
कांदापात (पुणे) ४० रु. जुडी १५ ते २० रु.
कांदापात (नाशिक) ५० ते ६० रु. जुडी ४० ते ५० रु.
शेपू (नाशिक) ५० रु. जुडी ४० रु.
शेपू (पुणे) ३० रु. जुडी १५ ते २० रु.
लालमाठ २० रु. जुडी १५ ते २० रु.
.नाशिकहून येणारी कोथिंंिबरीची जुडी महाग असल्याने ती विक्रेते आणि ग्राहकांना परवडत नाही, त्यामुळे सध्या नाशिकची जुडी विक्रीला आणत नसल्याचे ते म्हणाले. पालेभाज्या महाग झाल्याने चवळीची भाजी मिळेनाशी झाली होती. परंतु, आता या भाजीचीही आवक होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.