ठाण्यात पालेभाज्या, फळभाज्या महागल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:16 AM2019-06-14T00:16:38+5:302019-06-14T00:16:53+5:30
दुष्काळाचा फटका : विक्रेत्यांत चिंता, ग्राहकांत नाराजी
ठाणे : ठाण्याच्या बाजारपेठेत सोमवारपासून पालेभाज्या आणि फळभाज्यांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. मेथी, कोथिंबीर, आले, मिरची, टोमॅटो, घेवडा या भाज्यांचे दर गगनाला भिडल्याने विक्रेत्यांमध्ये चिंतेचे तर ग्राहकांत नाराजीचे वातावरण आहे.
जिथे आम्ही विक्रीसाठी कोथिंबीरच्या पाच जुड्या घेत होतो तिथे आता तीनच जुड्या घेत आहोत, असे भाजी विक्रेत्या शालन वायकर म्हणाल्या. महागड्या दरांमुळे ग्राहकही दोन जुड्यांऐवजी एकच जुडी खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पाऊस झाल्यास दिलासा मिळणार
ज्या भागांतून भाज्यांची आवक होते तिथे भाज्यांसाठी दुष्काळामुळे पाणी कमी पडायला लागले आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास महिनाभराने भाज्या स्वस्त होण्याची शक्यता आहे, असे भाजी विक्रेते संभाजी खेडेकर यांनी लोकमतला सांगितले.
भाजी प्रकार दर
मेथी ५० रुपये जुडी
पालक २० रुपये जुडी
चवळी ३० रुपये जुडी
कोथिंबीर ८० रुपये जुडी
कोबी ६० रुपये किलो
फ्लॉवर ८० रुपये किलो
टोमॅटो ८० रुपये किलो
फरसबी १२० रुपये किलो
मटार १६० रुपये किलो
घेवडा १२० रुपये किलो
भेंडी ८० रुपये किलो
वांगी ८० रुपये किलो
गवार ८० रुपये किलो
मिरची १६० रुपये किलो
आले २४० रुपये किलो