पंतप्रधान रोजगार कार्यक्रम रखडला, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:10 AM2018-09-22T03:10:37+5:302018-09-22T03:12:22+5:30

महामंडळाकडून येणारी कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवण्यासह महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंब होत आहे.

PM announces employment program, complaint to district collectors | पंतप्रधान रोजगार कार्यक्रम रखडला, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पंतप्रधान रोजगार कार्यक्रम रखडला, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Next

ठाणे : महामंडळाकडून येणारी कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवण्यासह महिला बचत गटांचे खाते उघडण्यासही बँकांकडून विलंब होत आहे. शिवाय, पंतप्रधान रोजगार कार्यक्रम रखडला असल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील बँकांच्या आढावा बैठकीत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे संबंधितांनी बुधवारी केल्या.
या आढावा बैठकीत शेतकºयांच्या पीक कर्जासह शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांमध्ये बँकांचे असलेले योगदान आणि आतापर्यंत विविध योजनांवर झालेला कर्जपुरवठा आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, माविम, श्यामराव पेजे कोकण इतर मागास आर्थिक विकास महामंडळ आदींनी बँकांकडे प्रकरणे दीर्घकाळासाठी प्रलंबित राहतात, अशा तक्रारी केल्या. महिला बचत गटांची खाती लवकर उघडण्यात येत नाहीत. यामुळे त्यांच्या कर्जपुरवठ्यासह संभाव्य विकासावरही परिणाम होतो, असे माविम प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक व्ही.बी. सोने यांनी त्यांच्याकडील पंतप्रधान रोजगारनिर्मिती कार्यक्रम, खादी आणि ग्रामोद्योग यामधील उद्दिष्टपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. बँकांनी त्यांच्याकडे प्रकरणे गेल्यानंतर त्यावर तातडीने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. प्रलंबित ठेवल्यास विपरित परिणाम होतो, असे सोने यांनी सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेतही केवळ १९ टक्के कर्जवाटप आतापर्यंत झाले असून ते वाढवण्याची गरज आहे. बँकांनी यासाठी तालुकानिहाय मेळावे घ्यावे, अशी सूचना जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे यांनी केली.

Web Title: PM announces employment program, complaint to district collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.