पंतप्रधान मोदींचा माजी खासदाराला कॉल; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 12:12 AM2020-04-25T00:12:08+5:302020-04-25T07:09:40+5:30

जगन्नाथ पाटील यांना मोदींचा फोन; तब्येत जपण्याचा सल्ला

pm modi calls former bjp mp jagannath patil ask him to take care of health | पंतप्रधान मोदींचा माजी खासदाराला कॉल; म्हणाले...

पंतप्रधान मोदींचा माजी खासदाराला कॉल; म्हणाले...

googlenewsNext

- अनिकेत घमंडी 

डोंबिवली : कोरोनाचा प्रादुर्भाव ज्येष्ठ नागरिकांना होण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांनी तब्येत सांभाळणे जास्त गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपमधील ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी फोनद्वारे संपर्क साधून तब्येत सांभाळण्याचा सल्ला देत आहेत. असाच फोन शुक्रवारी दुपारी भाजपचे माजी मंत्री व माजी खासदार जगन्नाथ पाटील यांना आला. मोदी यांचा फोन आल्याने फार आनंद झाला, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

मोदी यांनी पाटील यांच्याशी अडीच ते तीन मिनिटे संवाद साधला. त्यात त्यांनी पाटील यांच्या प्रकृतीशी चौकशी केली. पाटील यांनी यावेळी नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे सांगितले. त्यावर मोदी म्हणाले की मीही पाठोपाठ येत आहे. म्हणजे ते देखील ७० वर्षांच्या आसपास आहेत असे म्हणाले. त्यानंतर कौटुंबिक ख्यालीखुशाली विचारली. काळजी घ्या, आपण ज्येष्ठ कार्यकर्ते आहात. पक्ष उभारणीत तुमचे योगदान भरपूर आहे, असेही मोदी म्हणाले.

आठवणींना उजाळा
पाटील म्हणाले की, याआधी दिवंगत खा. चिंतामण वनगा यांच्या प्रचाराला तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी जव्हारमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी मला बघून प्रचंड गर्दीतही ‘जगन्नाथ पाटीलजी कैसे हो? असे विचारले होते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (लालजी) देखील प्रवासास आले असताना त्यांनी आवर्जून, ‘पाटीलजी कसे आहात’, असे विचारून चर्चा केली होती. आता मोदींनी ती परंपरा जपली आहे.

Web Title: pm modi calls former bjp mp jagannath patil ask him to take care of health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.