लहान मुलांसाठी न्यूमोनिया - ईन्फलूयंझा प्रतिबंधात्मक लसीकरणाची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 06:39 PM2021-08-10T18:39:38+5:302021-08-10T18:40:37+5:30

शिक्षण मंत्री, यांच्यासह कलेक्टर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सीईओ आदींना आदेश देण्याची मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली

Pneumonia for children - Influenza preventive vaccination demand | लहान मुलांसाठी न्यूमोनिया - ईन्फलूयंझा प्रतिबंधात्मक लसीकरणाची मागणी 

लहान मुलांसाठी न्यूमोनिया - ईन्फलूयंझा प्रतिबंधात्मक लसीकरणाची मागणी 

Next

ठाणे :  खूप दिवसांनी शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, ही आनंदाची बातमी आहे. पण  शाळा सुरू करीत असतांना कोरोनाची लस लहान मुलांसाठी येईल तेव्हा येईल.पण तत्पूर्वी न्यूमोनिया आणि ईन्फलूयंझा आदी  लस ऊपलब्ध करून देत त्यांचे लसीकरण करण्याची गरज आहे.

या लसींद्वारे बालकांचे आरोग्य आपण सुरक्षित ठेवणे शक्य आहे. त्यासाठी शिक्षण मंत्री, यांच्यासह कलेक्टर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद सीईओ आदींना आदेश देण्याची मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मंगळवारी केली. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस राजेंद्र चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. या शिष्टमंडळात पदाधिकारी प्रतिक साबळे, रूपेश हुंबरे, अनिकेत मोरे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता. 

Web Title: Pneumonia for children - Influenza preventive vaccination demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.