रेल्वेची धोकादायक पाण्याची टाकी कोसळल्याने पोकलेन चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 09:29 PM2018-08-20T21:29:01+5:302018-08-20T21:35:55+5:30

Poklane driver seriously injured due to collapsing of dangerous water tank | रेल्वेची धोकादायक पाण्याची टाकी कोसळल्याने पोकलेन चालक गंभीर जखमी

रेल्वेची धोकादायक पाण्याची टाकी कोसळल्याने पोकलेन चालक गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देधोकादायक ९० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी कोसळली१९७५ साली भिवंडी रोड रेल्वे स्थानकालगत टाकी बांधण्यात आलीपोकलनव्दारे धोकादायक पाण्याच्या टाकी पाडण्याचे काम सुरू होते

भिवंडी : शहरातील अंजूरफाटा येथील भिवंडी रोड रेल्वे स्टेशन व्यवस्थापनाच्या अख्त्यारीतील धोकादायक ९० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आज सोमवार रोजी दुपारी पोकलनच्या सहाय्याने खाली पाडत असताना अचानकपणे टाकी पोकलेनवर कोसळून चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही टाकी जमिनीवर पडल्यानंतर झालेल्या आवाजाने परिसरांत काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.
विजय पवार (४०)असे जखमी कामगारांचे नाव असून त्यास उपचार करीता मुंबई येथे हलविण्यात आले आहे . सन १९७५ साली भिवंडी रोड रेल्वे स्थानक बनविण्यात आले असून या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी ९० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बनविण्यात आली होती. टाकीतील पाणी मोठ्या प्रमाणात झिरपू लागल्याने लागल्याने ती धोकादायक बनली होती. त्यामुळे ती टाकी पाडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. मागील दोन दिवसांपासून पाण्याची टाकी पाडण्यासाठी काम सुरू होते.आज सोमवार रोजी पोकलेन लावून टाकी पाडली जात असताना टाकीचा मोठा भाग खाली पोकलनवर कोसळला. टाकीतील काही भागात पावसाचे पाणी जमा झाल्याचा अंदाज न बांधल्याने टाकीचा तो भाग पोकलेन पडत असल्याचे पाहून चालक विजय पवार हा पोकलेन सोडून पळत जात होता. त्याचवेळी टाकीचा काही भाग त्याच्या अंगावर पडला व इतर भाग पोकलनवर कोसळला. या दुर्घटनेत विजय पवार गंभीर जखमी झाला असून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यास बाहेर काढले. जवळच अंजूरफाटा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर प्रथमोपचार करून त्यास मुंबईतील रूग्णालयांत पुढील उपचारासाठी पाठविले. या प्रकरणी नारपोली पोलीस स्टेशन येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Poklane driver seriously injured due to collapsing of dangerous water tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.