भिवंडीत गांजा पिणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; एकाच दिवशी नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल

By नितीन पंडित | Published: June 19, 2023 07:45 PM2023-06-19T19:45:31+5:302023-06-19T19:45:46+5:30

भिवंडी : भिवंडी शहरात गांजा चरस तसेच इतर मादक पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री व सेवन केले जात आहे.असे असताना ...

Police action against ganja drinkers in Bhiwandi; Cases were filed against nine people on the same day | भिवंडीत गांजा पिणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; एकाच दिवशी नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल

भिवंडीत गांजा पिणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; एकाच दिवशी नऊ जणांविरोधात गुन्हे दाखल

googlenewsNext

भिवंडी: भिवंडी शहरात गांजा चरस तसेच इतर मादक पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री व सेवन केले जात आहे.असे असताना भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी अशा मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यां विरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना सर्व पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्या नंतर भिवंडी शहरात रविवारी एकाच दिवशी तब्बल नऊ गांजा ओढणाऱ्यांविरोधात कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.यामध्ये सात आरोपी हे नारपोली पोलीस ठाण्यातील तर दोन आरोपी कोनगाव व भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत नारपोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत अन्वर नसरद हुसेन वय ३२,रा.हनुमान नगर कामतघर,आदित्य व्यकटेश संगमवय १९,रा.अंजुरफाटा,राज बालाजी सोलापुरी वय २२,रा.कणेरी,सलमान मुकरम शेख वय १९,रा.अंजुरफाटा,चॉदअली मोहरम अली खान,वय ३३ ,रा.घुंगटनगर,शिवसाई प्रकाश बेहरा,वय २३ बालाजीनगर , अर्श खालीद अख्तर वय ३०,रा.राबोडी ठाणे,तर कोनगाव पोलिस ठाणे हद्दीत अब्दुल कादीर साबीर खान वय ३०,रा.न्यु आझादनगर, शांती नगर,मोहम्मद नासीर मोहम्मद अन्वर मोमीन वय ३४,रा.दिवानशहा दर्गाच्या मागे आजमीनगर या वर भोईवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्वांना सीआरपीसी कलम ४१ (१) (अ) प्रमाणे नोटीस देऊन सोडून देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Police action against ganja drinkers in Bhiwandi; Cases were filed against nine people on the same day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.