अश्लील व्हीडिओ करणाऱ्याविरुद्ध अखेर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

By जितेंद्र कालेकर | Published: February 26, 2019 10:25 PM2019-02-26T22:25:34+5:302019-02-26T22:36:06+5:30

इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुला मुलींचे चोरुन चित्रण करणाºया अविनाशकुमार यादव (३४) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पोसिलांनी सांगितले.

police add posco code against accused of molestation | अश्लील व्हीडिओ करणाऱ्याविरुद्ध अखेर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

कापूरबावडी पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्दे पुन्हा केली जाणार अटकदुसऱ्या दिवशीही पोलीस ठाण्यात रहिवाशांची गर्दी कापूरबावडी पोलिसांची कारवाई

ठाणे : ढोकाळी येथील एका इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुला मुलींचे चोरुन चित्रण करणा-या अविनाशकुमार यादव (३४) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी आता लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायदा ११-१२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याआधी विनयभंगाच्या कलम ३५४-क नुसार त्याला अटक झाली होती. आता पुन्हा अटक केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी सायंकाळी सोसायटीच्या सर्व महिलांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर त्याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा ६६- ब आणि पोक्सो ही कलमेही दाखल करण्यात आली आहेत. तळ अधिक सहा मजली असलेल्या ए आणि बी विंगच्या दोन वेगवेगळया इमारतींमध्ये ८३ सदनिका आहेत. यातील ए विंगच्या इमारतीमध्ये त्याने हा चित्रणाचा प्रकार केला. इमारतीमध्ये जिन्यातून जाताना जवळच बाथरुमच्या खिडक्या आहेत. त्याच खिडक्यांमध्ये रहिवाशांच्या नकळत तो मोबाईल ठेवून चित्रीकरण करीत होता. एक १४ वर्षांची मुलगी, ११ वर्षांचा मुलगा, काही महिला आणि पुरुषांचेही त्याने या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. एका महिलेच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर तिने आरडाओरडा केला. तेव्हा तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच इमारतीमधील इतर रहिवाशांनी चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. २३ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या पथकाने त्याला अटक केली. आधी हे प्रकरण सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे यांच्याकडे होते. आता ते महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांच्याकडे सोपविले आहे. त्याने मोबाईलच्या माध्यमातून गूगलमध्ये फोटो सेव्ह केल्यामुळे त्याच्यावर कडक कारवाईसाठी मंगळवारीही रहिवाशांनी कापूबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्याच्या मोबाईलमधून २४ अश्लील व्हिडीओ मिळाले असून सायबर सेल क्राईमच्या मदतीने त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले.
विनयभंगाच्या गुन्ह्यात त्याची जामीनावर सुटका झाली असली तरी त्याच्यावर पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कलमे वाढविली आहेत. त्यामुळे जामीन रद्द होऊन त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयात केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अश्विनी जाधव यांनी सांगितले.

Web Title: police add posco code against accused of molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.