उल्हासनगर पालिकेवर पुन्हा आणला जनाजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 02:39 AM2018-02-09T02:39:41+5:302018-02-09T02:39:50+5:30
कबरस्तानची मागणी पूर्ण नसल्याच्या संतापातून गुरुवारी पुन्हा उल्हासनगर महापालिकेवर जनाजा आणण्यात आला. संतप्त मुस्लिमांनी लवकरात लवकर कबरस्तानसाठी जागा मिळावी, अशी मागणी केली.
उल्हासनगर : कबरस्तानची मागणी पूर्ण नसल्याच्या संतापातून गुरुवारी पुन्हा उल्हासनगर महापालिकेवर जनाजा आणण्यात आला. संतप्त मुस्लिमांनी लवकरात लवकर कबरस्तानसाठी जागा मिळावी, अशी मागणी केली. आठवडाभरात याच विषयावर पालिकेच्या आवारात जनाजा आण्याण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालिका आयुक्तांनी शुक्रवारी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना या विषयावर तोडगा काढण्यासाठी चर्चेला बोलावल्याची माहिती मैनुद्दीन शेख यांनी दिली.
मृतदेह घेऊन एका शहारातून दुसºया शहरात जाण्यासाठी होणारा खर्च, दंड अशी दुहेरी कोंडी होते. या प्रकाराने शहरातील मुस्लिम अस्वस्थ आहेत. गेली २५ ते ३० वर्षे ते कबरस्तानची मागणी ते करत आहेत. त्यासाठी आंदोलने झाली. मोर्चा काढला गेला. राज्य सरकारकडे पाठपुरावा झाला. न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. अखेर न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने कबरस्तानसाठी जागा देण्याचे आदेश महापालिकेला दिले. त्यानंतरही जागा ताब्यात येत नसल्याने गुरूवारी सी ब्लॉकमधील हाजी मोसिन खान यांचा जनाजा महापालिके समोर आणून पुन्हा कबरस्तानची मागणी झाली. त्यामुळे आयुक्तांनी या विषयावर चर्चेसाठी समाजातील व्यक्तींना बोलावले आहे. त्यात काही तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.
>जनाजा पाहून नकार
उल्हासनगर शहरात कबरस्तान नसल्याने मुस्लिमांना दफनविधीसाठी जनाजा घेऊन अंबरनाथ किंवा कल्याणला जावे लागते.
उल्हासनगरातील जनाजा दिसल्यावर तेथील कबरस्तानात नकार दिला जातो. प्रसंगी दंड आकारला जातो.