पोलिसांकडूनही बंदोबस्ताची जय्यत तयारी
By admin | Published: October 26, 2015 12:39 AM2015-10-26T00:39:06+5:302015-10-26T00:39:06+5:30
निवडणुकी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये याची खबरदारी कल्याण डोंबिवलीच्या पोलिसांनी घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून स्वसंरक्षणासाठी ज्यांना पिस्तुल दिली आहेत
कल्याण : निवडणुकी दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू नये याची खबरदारी कल्याण डोंबिवलीच्या पोलिसांनी घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून स्वसंरक्षणासाठी ज्यांना पिस्तुल दिली आहेत. ती जमा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून आतापर्यंत ३७० पिस्तुल जमा करण्यात आली आहेत. तर चार जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
केडीएमसीच्या निवडणुकीचे मतदान १ नोव्हेंबरला होत आहे. १२२ जागांसाठी निवडणुक होणार होती. परंतू तीन प्रभागात शिवसेना, भाजपा आणि बसपाचा प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. तर अन्य दोन प्रभागात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झालेला नाही. त्यामुळे हे पाच प्रभाग वगळता ११७ प्रभागांमध्ये निवडणूक होत आहे. (प्रतिनिधी)