लाच घेताना पोलिसाला अटक, अंबरनाथमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:52 PM2017-09-24T23:52:24+5:302017-09-24T23:52:42+5:30
बेकायदा काम करणा-यांचे पोलिसांसोबत असलेले लागेबांधे पुन्हा एकदा समोर आले आहेत. अंबरनाथमधील एका भंगार विक्रेत्याकडून लाच घेताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली
अंबरनाथ : बेकायदा काम करणा-यांचे पोलिसांसोबत असलेले लागेबांधे पुन्हा एकदा समोर आले आहेत. अंबरनाथमधील एका भंगार विक्रेत्याकडून लाच घेताना अंबरनाथ पोलीस ठाण्यातील एका पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या प्रकरणातून पोलिसांची हफ्ता वसुली अंबरनाथमध्ये जोरात सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक अनिल पाटील हा अंबरनाथमधील बेकायदा कामे करणाºयांकडून हफ्ता वसुली करत असल्याचे लाचलुचपत विभागाच्या कायरवाईने पुढे आले आहे. पाटील याने बुवापाडा येथील एका भंगार विक्रेत्याकडून लाच मागितली होती.
अंबरनाथमध्ये भंगार विक्रीचा व्यवसाय करायचे असल्यास पैसे द्यावे लागतील असे त्याने स्पष्ट केले होते. त्यामुळे या भंगार विक्रत्याने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती. शनिवारी पाटील अंबरनाथच्या हुतात्मा चौकात लाचेची रक्कम घेण्यासाठी येणार असल्याचे कळताच लाचलुचपत विभागाच्या अधिकाºयांनी सापळा रचला होता. पाटील हे भंगार विक्रत्याकडून पैसे घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी त्याला रंगेहाथ पकडले.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेतली असता तक्रारदार आणि पाटील यांचे पूर्वीपासून वाद होते.