उल्हासनगरात लाच घेताना पोलिसाला रंगेहात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 04:50 PM2020-03-08T16:50:59+5:302020-03-08T16:51:14+5:30

शहरातील गुन्हेगारी सोबत जुगार अड्ड्या बाबत चर्चा सुरू झाली असून राजकीय पदाधिकारी, तथागथित समाजसेवक व पत्रकार यांच्या आशीर्वाददाच्या आड जुगाराचे अड्डे सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू झाली.

Police arrested in bribery case in Ulhasnagar rkp | उल्हासनगरात लाच घेताना पोलिसाला रंगेहात अटक

उल्हासनगरात लाच घेताना पोलिसाला रंगेहात अटक

Next

उल्हासनगर : शहर पूर्वेतील जुगार अड्ड्यावर कारवाई टाळण्यासाठी 1 लाख 40 हजाराची लाच घेताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी रात्री 11 वाजता पोलीस शिपाई प्रशांत चतुर्भुज याला अटक केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला चतुर्भुज हा हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगाराचे पैसे मागायला गेला कशा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उल्हासनगरात जुगाराचे अड्डे सर्रासपणे सुरू असल्याची चर्चा सुरू होती.  दरम्यान पोलीस उपयुक्तांच्या आदेशानव्हे झालेल्या कारवाईत जुगाराचे अड्डे बंद झाल्याचे बोलले जात होते. अशावेळी हिललाईन पोलीस ठाण्यातील एका जुगार अड्ड्यावर कारवाई टाळण्यासाठी 1 लाख 40 हजाराची मागणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपाई प्रशांत चतुर्भुज यांनी केली. तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केल्यावर विभागाने रविवारी साफळा रचून रविवारी रात्री पावणे अकरा वाजता 1 लाख 40 हजाराची लाच घेतांना रंगेहात अटक केली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

शहरातील गुन्हेगारी सोबत जुगार अड्ड्या बाबत चर्चा सुरू झाली असून राजकीय पदाधिकारी, तथागथित समाजसेवक व पत्रकार यांच्या आशीर्वाददाच्या आड जुगाराचे अड्डे सुरू असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. पोलीस अश्या जुगार अड्ड्याच्या शोधत असून कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले. तसेच लाचखोर पोलीस शिपाई प्रशांत चतुर्भुज यांच्या बाबत अनेक चर्चेला सोशल मीडियावर ऊत आला आहे. 
 

Web Title: Police arrested in bribery case in Ulhasnagar rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.