भाईंदरमध्ये आठ किलो सोन्याची चोरी करणा-याला पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2017 08:44 PM2017-10-13T20:44:52+5:302017-10-13T20:44:58+5:30

अंबरनाथ येथील सागर ज्वेलर्सच्या दुकानातील मागचे दार तोडून चोरट्याने भर दिवसा 8.5 किलो सोने चोरले होते. या चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होता.

Police arrested the eight kg gold bullion in Bhayander | भाईंदरमध्ये आठ किलो सोन्याची चोरी करणा-याला पोलिसांनी केली अटक

भाईंदरमध्ये आठ किलो सोन्याची चोरी करणा-याला पोलिसांनी केली अटक

Next

अंबरनाथ : अंबरनाथ येथील सागर ज्वेलर्सच्या दुकानातील मागचे दार तोडून चोरट्याने भर दिवसा 8.5 किलो सोने चोरले होते. या चोरट्याचा चेहरा सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले होता. या प्रकरणात चोरटय़ाचा तपास करीत उल्हासनगर पोलीस उपायुक्तांच्या पथकाने या चोरट्याला मुद्देमालासह भाईंदरमध्ये अटक केली आहे. चोरीला गेलेल्या सोन्यापैकी 85 टक्के सोने देखील पोलिसांनी हस्तगत केल्याचे समोर येत आहे.
अंबरनाथच्या सागर ज्वेलर्स या दुकानात 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी चोरी झाली होती. या दुकानातुन 8.5 किलो सोने चोरण्यात आले होते. या प्रकारानंतर पोलिसांनी चोरट्याला अटक करण्यासाठी पथक तयार केले होते. या पथकापैकी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्याचा इतिहास तपासला असता विनोद सिंग या सराईत गुन्हेगाराचा चेहरा या आरोपीबरोबर जुळत होता. अखेर या आरोपीचा शोध घेतला असता तो भाईंदरमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त यांच्या पथकाने भाईंदरमधुन विनोद सिंग याला अटक केली आहे. या आधी विनोद सिंग याला 2006 मध्ये अटक करण्यात आलेली होती. हा चोरटा मध्यप्रदेशातील आझमगडचा रहिवासी असून हाय प्रोफाईल गुन्हेगारांमध्ये त्याचा समावेश आहे. एवढेच नव्हे तर तो एका राज्यातून दुस-या राज्यात सतत विमानाने प्रवास करतो. आरोपीला अटक केल्यावर त्याच्याकडून चोरलेल्या सोन्यापैकी 85 टक्के सोने हस्तगत करण्यात आले आहे. विनोद याच्या सोबत त्याचे इतर तीन ते चार साथीदार देखील या प्रकणात असून पोलीस त्यांना देखील अटक करण्याचा प्रयत्न करित आहेत. अवघ्या 5 दिवसात येवढय़ा मोठय़ा चोरीच्या घटनेचा तपास पोलीसांनी पूर्ण केल्याचे अंबरनाथ व्यापारी संघाने पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Police arrested the eight kg gold bullion in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा