ठाण्यात मोबाइलची जबरी चोरी करणा-या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:04 PM2019-10-25T22:04:23+5:302019-10-25T22:15:18+5:30

निवडणूक बंदोबस्ताच्या दरम्यान संशयितांना हटकल्यानंतर त्यांनी मोटारसायकलवरुन पळ काढला. या दोघांना पाठलाग करुन पकडल्यानंतर त्यांच्याकडून मोबाइल चोरीचे चार गुन्हे उघड झाले असून त्यांच्याकडून दहा मोबाईल आणि एक मोटारसायकल असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

Police arrested two people for allegedly stealing mobile phones in Thane | ठाण्यात मोबाइलची जबरी चोरी करणा-या दोघांना अटक

नौपाडा पोलिसांची कामगिरी

Next
ठळक मुद्देनौपाडा पोलिसांची कामगिरीपाठलाग करुन पकडलेदहा मोबाईलसह एक मोटारसायकल हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मोटारसायकलवर येउन मोबाइलची जबरी चोरी करणा-या असिफ मलिक बागवान(२०, रा. नेहरुनगर, नयावस्ती, भिवंडी, ठाणे) आणि अकबर उर्फ दिशान शेख (२०, रा. कल्याण भिवंडी रोड, भिवंडी, ठाणे) दोघांना नौपाडा पोलिसांनी पाठलाग करुन पकडले. या दोघांनाही नुकतीच अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दहा मोबाईल आणि एक मोटारसायकल असा एक लाख तीन हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांचे पथक १८ आॅक्टोबर २०१९ रोजी गस्त घालीत होते. त्यावेळी दोघेजण अंधारामध्ये संशयास्पदरित्या उभे असलेले या पथकाला आढळले. त्यांच्याकडे विचारपूस करण्याआधीच त्यांनी मोटारसायकलवरुन पळ काढला. त्यावेळी त्यांचा पाठलाग करु न त्यांना उपनिरीक्षक लबडे यांच्यासह पोलीस हवालदार सुनिल अहिरे, पोलीस नाईक संजय चव्हाण, साहेबराव पाटील, सुनिल राठोड, बाळू पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास चडचणकर, गोरखनाथ राठोड आणि गणेश मदन आदींच्या पथकाने धरपकड केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. आपले कसब पणाला लावून या पथकाने त्यांना बोलते केले असता, त्यांनी चोरीसाठीच या परिसरात आल्याची कबूली दिली. याआधी नौपाडयातील जबरी चोरीचे दोन आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील दोन असे चार गुन्हे उघडकीस आले. जबरी चोरीसाठी त्यांनी वापरलेल्या एका मोटारसायकलसह दहा मोबाइल फोन असा एक लाख तीन हजार ५०० चा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला. त्यांनी ९ सप्टेंबर २०१० रोजी एका २१ वर्षीय तरुणीचा तीन हात नाका, नाशिक ते मुंबईकडे जाणाºया मार्गावर मोबाईल हिसकावल्याचेही चौकशीत उघड झाले. या दोघांनाही पोलिसांनी १९ आॅक्टोबर रोजी अटक केली. दोघांनाही सुरुवातीला २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्यांना पुन्हा ठाणे न्यायालयामार्फत २५ आॅक्टोबर रोजी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Police arrested two people for allegedly stealing mobile phones in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.