उल्हासनगरात पोलिसांनी काढली गुंडाची धिंड
By सदानंद नाईक | Updated: July 2, 2024 20:15 IST2024-07-02T20:15:14+5:302024-07-02T20:15:50+5:30
याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगरात पोलिसांनी काढली गुंडाची धिंड
सदानंद नाईक, उल्हासनगर : हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक केलेल्या दोन गुंडाची पोलिसांनी गोलमैदान परिसरात हातात हाथकडी टाकून धिंड काढण्यात आली. नागरिका मध्ये गुंडाच्या दहशत कमी करण्यासाठी गुंडाची धिंड काढल्याचे बोलले जाते.
उल्हासनगरपोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी माळशेज घाटातून सोहन अनिल पवार व यश सुरेश पवार यांना अटक केली होती. या गुंडाची दहशत समाजातून कमी व्हावी. यासाठी सोमवारी दोन्ही गुंडाची हाथकडी टाकून गोलमैदान परिसरातून धिंड काढण्यात आली. त्यानंतर न्यायालया समोर त्यांना हजर केले असता दोन दिवासाची पोलीस कस्टडी देण्यात आली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.