उल्हास नदीवर आंघोळीसाठी गेलेल्यांना पोलिसांनी पिटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:24 AM2021-03-30T04:24:34+5:302021-03-30T04:24:34+5:30
कल्याण : धुळवडीनंतर काही तरुण आंघोळीसाठी रायते पुलानजीक उल्हास नदीवर गेले असता नदीमित्रांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी नदीत आंघोळ ...
कल्याण : धुळवडीनंतर काही तरुण आंघोळीसाठी रायते पुलानजीक उल्हास नदीवर गेले असता नदीमित्रांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी नदीत आंघोळ करणाऱ्या तरुणांना पिटाळून लावले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना होळी व धुळवड साजरी करू नका, असे आवाहन प्रशासनाने केले होते. मात्र अनेकांनी या आवाहनाला दाद दिली नाही. होळी व धुळवडही साजरी केली. त्यानंतर तरुणाई रायते पुलानजीक उल्हास नदीजवळ आंघोळीसाठी गेली. हा प्रकार नदीमित्र रशीद शेख आणि सुदाम भोईर यांच्या लक्षात आला. उल्हास नदी आधीच प्रदूषित झाली आहे. त्यात रंगाने माखलेल्या तरुणांनी पाण्यात आंघोळ केल्यावर नदी आणखी प्रदूषित होणार. त्यामुळे शेख व भोईर यांनी काही तरुणांना आंघोळ करण्यास मज्जाव केला. मात्र, त्यांनी दाद न दिल्याने दोघांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवित आंघोळ करणाऱ्या तरुणांना तेथून पिटाळून लावले.
---------------------