...त्या अडीच लाखांवर पोलिसांचा दावा; खातरजमा होईपर्यंत रक्कम न देण्याचा लोहमार्ग पोलिसांचा पवित्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 03:59 AM2018-09-04T03:59:52+5:302018-09-04T04:00:15+5:30
रेल्वेस्थानकावर एका प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेली सुमारे अडीच लाखांची रोकड मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाने आपली असल्याचा दावा केला आहे. ती रक्कम परत मिळावी, यासाठी त्याने सहा दिवसांनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली.
- पंकज रोडेकर
ठाणे : रेल्वेस्थानकावर एका प्लास्टिकच्या पिशवीत सापडलेली सुमारे अडीच लाखांची रोकड मुंबई पोलीस दलातील एका पोलिसाने आपली असल्याचा दावा केला आहे. ती रक्कम परत मिळावी, यासाठी त्याने सहा दिवसांनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच घर घेण्यासाठी पैसे घेऊन जाताना ती रक्कम गहाळ झाल्याचे त्याने निवेदनपत्रात म्हटले आहे. मात्र, अद्याप ती रक्कम त्याची असल्याची खातरजमा न झाल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्याला ती दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहापूर येथील रहिवासी विजय भेरे (४०) हे सोमवारी २० आॅगस्ट रोजी दुपारी मुंबईत काही कामानिमित्त गेले होते. काम संपल्यानंतर ते दादर रेल्वेस्थानकातून दुपारी परतीचा प्रवास करण्यासाठी कर्जत फास्ट लोकलमध्ये बसले. ठाण्यात काम असल्याने ते फलाट क्रमांक-५ वर उतरले. त्याचवेळी त्यांना फलाटावर एक पिशवी बेवारस पडलेली दिसली. ती कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासाठी उचलली. डब्यात फेकणार तोच कागदपत्रे असल्याचे निदर्शनास आल्यावर कुतूहल म्हणून पिशवीत डोकावल्यावर त्यांना एक वृत्तपत्र दिसले. ते उघडून पाहिल्यावर त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटांचे दोन बंडल निदर्शनास आले.
ती रक्कम कुणाची तरी पडलेली असावी, म्हणून त्यांनी रेल्वे पोलीस ठाण्याचा पत्ता फलाटावर विचारून पोलीस ठाणे गाठले. तेथे त्या पैशांची मोजणी केल्यावर ते दोन लाख ३८ हजार रुपये असल्याचे स्पष्ट झाले. तसेच पोलिसांमार्फत त्या नोटा एका बँकेच्या अधिकाºयामार्फत खºया आहेत की खोट्या, याची पडताळणी केली. त्या खोºया नोटा असल्याचे बँक अधिकाºयाने सांगितल्यावर
ती रक्कम भेरे यांनी लोहमार्ग
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या स्वाधीन केली.
बदलापूर येथे घर बुकिंग करण्यासाठी जाताना रक्कम झाली गहाळ
दरम्यान, पोलीस पैसे पडल्याची कोणती तक्रार कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल आहे का, याचा आढावा घेत होते. मात्र, तशी कोणतीच तक्रार नाही. पण, सहा दिवसांनी एक व्यक्ती लोहमार्ग पोलीस ठाण्यात धडकली आणि आपले पैसे गहाळ झाल्याचे सांगू लागली.
ती व्यक्ती पोलीस असून बदलापूर येथे घर बुकिंग करण्यासाठी पैसे भरण्यासाठी जात होतो. त्यावेळी ती रक्कम गहाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी लेखी लिहून देण्यास सांगितल्यावर तसेच लेखी लिहून दिले आहे.
मात्र,जोपर्यंत त्याबाबत खातरजमा होत नाही. तोपर्यंत ती रक्कम दिली जाणार नसल्याचा पवित्रा लोहमार्ग पोलिसांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.