दिवा येथील उपाशी कलाकार कुटूंबियांची पोलीस आयुक्तांकडून दखल

By जितेंद्र कालेकर | Published: April 13, 2020 09:34 PM2020-04-13T21:34:07+5:302020-04-13T21:42:08+5:30

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी अनेक ठिकाणी पोलीस स्वत:ही जेवणाची पाकिटे आणि गरजवंतांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप करीत आहेत. दिवा येथील दूरदर्शन मालिकांमध्ये दुय्यम भूमीका करणा-या एका दाम्पत्याला थेट पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्फतीने पोलिसांनी अन्नधान्याची मदत केल्यामुळं या दाम्पत्याने पोलीस आणि मदत करणाºया मनसेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.

Police Commissioner gave helping hand to Hunger Artist Family Of Diva | दिवा येथील उपाशी कलाकार कुटूंबियांची पोलीस आयुक्तांकडून दखल

सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पाठविली अन्नधान्याची पाकिटे

googlenewsNext
ठळक मुद्देसहाय्यक पोलीस आयुक्तांनी पाठविली अन्नधान्याची पाकिटेमनसेनेही केली मदत मदत मिळताच कुटूंबियांनी मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: दिव्यात एका ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून तीन वर्षांच्या मुलीसह एक दाम्पत्य उपाशी असल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक रविवारी रात्रीच तिथे रवाना झाले. त्यांना धान्याची थैलीही दिली. शिवाय, काही अडचण असल्यास जरुर सांगा, असेही या बिट मार्शल पोलिसांनी त्यांना सांगितल्याने पोलिसांच्या रुपात आंम्हाला देवानेच ही मदत केल्याची त्यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली.
विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाईचा बडगा उगारला जात असला तरी अनेक ठिकाणी पोलीस स्वत:ही जेवणाची पाकिटे आणि गरजवंतांना अन्नधान्याच्या पाकिटांचे वाटप करीत आहेत. पोलिसांच्या या कामगिरीचेही नागरिकांमधून कौतुक होत आहे. दिवा येथील वसंत विहार बंगलो परिसरात टीव्हीवरील मालिकांमध्ये दुय्यम भूमीका करणाºया एका दाम्पत्याला संचारबंदीचा चांगलाच फटका बसला. उत्पन्नाची कोणतीची साधने नाही आणि जवळचा सर्व पैसाही संपला त्यामुळे घरात अन्नधान्यही नाही. मुंबईतील मनसेच्या एका पदाधिकाºयाकडून त्यांच्यावरील परिस्थितीची माहिती मिळाल्यामुळे मनसेचे वर्तकनगर येथील शाखाध्यक्ष संतोष निकम यांनी त्यांना आॅनलाईन काही पैसेही ट्रान्सफर केले. पण, त्यांना तांदूळ, गहू, डाळ, तेल,कांदे, बटाटे आणि चहा पावडरही त्यांना द्यायची होती. पण वर्तकनगर येथून दिवा भागाकडे संचारबंदी असतांना जाणार कसे? हा प्रश्न होता. ज्यांना हे पाठवायचे आहे, त्यांच्याकडे गेली तीन दिवस अन्न नाही. त्यांना एक तीन वर्षांची मुलगीही आहे. ही बाब एका पत्रकाराकडून पोलीस आयुक्त फणसळकर यांच्यापर्यंत आली. किमान त्यांना हे सामान पोहचविण्याची परवानगी मिळाली तरी चालेल, असाही त्यांना निरोप मिळाला. हा निरोप रविवारी रात्री ८ वाजता मिळताच अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल घोसाळकर यांनी त्या परिवाराची आस्थेने चौकशी केली. वर्तकनगर येथून त्यांच्यासाठी सामान घेऊन येणा-या निकम यांनाही रितसर परवानगी दिली. शिवाय, घोसाळकर यांनी पाठविलेल्या दोन बिट मार्शल यांनीही एका स्वयंसेवी संस्थेमार्फतीने रात्री १०.३० वाजेपर्यंत पुरेसे अन्नधान्यही दिले. इतक्या रात्री पोलीस आणि मनसेचे कार्यकर्ते हे आम्हाला देवदूतासारखेच धावून आले, अशी प्रतिक्रीया या कलाकारांनी व्यक्त केली.

Web Title: Police Commissioner gave helping hand to Hunger Artist Family Of Diva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.