फटाके बंदीवरुन ठाण्यात रिपाइं आणि शिवसेना, मनसे भिडणार रिपाइंने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 06:55 PM2017-10-12T18:55:32+5:302017-10-12T19:02:48+5:30

फटाके बंदीच्या मुद्यावरुन आता ठाण्यात शिवसेना, मनसे फटाके विक्रेत्यांच्या बाजूने असतांना आता ठाणे शहर रिपाइं मात्र या फटाक्यांवाल्यांच्या विरोधात मैदानात उतरली आहे. रिपाइंने रस्त्यावर फटाके विक्रीला बंदी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

Police commissioner meets visit to Thane, Shiv Sena, MNS to confront crackers | फटाके बंदीवरुन ठाण्यात रिपाइं आणि शिवसेना, मनसे भिडणार रिपाइंने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

फटाके बंदीवरुन ठाण्यात रिपाइं आणि शिवसेना, मनसे भिडणार रिपाइंने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Next
ठळक मुद्देफटाक्यावाल्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधार्थ एकमेकांसमोर उतरणाऱ्या या पक्षांच्या भूमिकांमुळे ठाणो पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न ठाण्यातील फटाके व्यापारी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून ठाणेकरांच्या जीविताशी खेळत आहेतदुकानाच्या परिसरातच फटाक्यांचे मोठे गोडावून असल्याने कोपरी परिसरातील लाखो नागरिकांना मोठा धोका


ठाणे - शिवसेना आणि महारष्ट्र नविनर्माण सेना फटाके बंदीच्या विरोधात रस्त्यावर उतणार आहे. तर न्यायालयाचा आदर करून हवेतील प्रदूषण टाळाण्याच्या समर्थनार्थ आठवले यांचा रिपब्लिकन पक्षही फटाक्यावाल्यांच्या विरोधात रत्यावर उतरणार असल्याच्या भूमिकेत आहे. त्यामुळे फटाक्यावाल्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधार्थ एकमेकांसमोर उतरणाºया या पक्षांच्या भूमिकांमुळे ठाणे पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना आणि मनसेने त्यांची भूमिका जाहीर केल्यानंतर गुरु वारी ठाणे रिपाइंने ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन एकाही फटाक्याचे दुकान रस्तावर लावू देणार नाही. अशी कडक भूमिका घेतली आहे.
दिल्ली न्यायालयाने फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत. तर राज्य शासनानेही याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यामुळे फटाका विक्रेत्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. असे असतानाच महारष्ट्र नविनर्माण सेना आणि शिवसेनेने फटाक्यावाल्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेत आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला आहे. त्यावर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आ) ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन न्यायालय आणि राज्य शासनाच्या परिपत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. ठाण्यातील फटाके व्यापारी सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून ठाणेकरांच्या जीविताशी खेळत आहेत. कोपरीतील गावदेवी मैदान ते दीपक लस्सीवाला कॉर्नर परिसरात मोठ्या प्रमाणत फटाक्यांची दुकाने थाटलेली आहेत. तसेच दुकानाच्या परिसरातच फटाक्यांचे मोठे गोडावून असल्याने कोपरी परिसरातील लाखो नागरिकांना मोठा धोका आहे. आजवर कायदे धाब्यावर बसवून हे फटाक्याचे व्यापरी नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. त्यामुळे आता न्यायालयाच्या आदेशाने फटाक्यांवर बंदी आलेली असतानाही काही पक्षांकडून न्यायालय आणि राज्य शासनाच्या आदेशाचा भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे अशा पक्षांवर कायदेशीर कारवाई करून फटाक्यांवरील बंदी कायम ठेवावी अशी मागणी ठाण्याचे अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी केली आहे. पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे पत्रकही पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांना देण्यात आले. यावेळी पक्षाचे ठाणे महासचिव मंगेश सदरे, कामगार युनियन अध्यक्ष विशाल ढेंगळे, प्रवक्ता विकास चव्हाण, वागळे उपाध्यक्ष बालाजी नारायणकर आदी उपस्थित होते.

Web Title: Police commissioner meets visit to Thane, Shiv Sena, MNS to confront crackers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.