पोलीसपुत्राची आत्महत्या

By admin | Published: January 28, 2017 02:51 AM2017-01-28T02:51:43+5:302017-01-28T02:51:43+5:30

मद्यधुंद अवस्थेतील पोलीसपुत्राची पोलिसांनी चौकशी केल्याने झालेल्या वादात त्याने थेट खाडीत उडी मारून आत्महत्या केली.

Police couple commit suicide | पोलीसपुत्राची आत्महत्या

पोलीसपुत्राची आत्महत्या

Next

मीरा रोड : मद्यधुंद अवस्थेतील पोलीसपुत्राची पोलिसांनी चौकशी केल्याने झालेल्या वादात त्याने थेट खाडीत उडी मारून आत्महत्या केली. विक्रांत ऊर्फ विकी भांडे (२१) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याला वाचवण्यास गेलेल्या मित्राला मात्र पोलिसांनी बुडण्यापासून वाचवले. मृत्यूपूर्वी विकीला पोलिसांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची व्हॉइस क्लिप व्हायरल झाल्याने नवघर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी सुरुवातीला तपास केला. पण, सध्या स्थानिक पोलिसच याबाबत तपास करीत आहेत. मृत विकीचे वडील गोराई पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Police couple commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.