भिवंडीत अटक केलेल्या तीन बांगलादेशी नागरिकांना पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 10:45 PM2019-01-24T22:45:11+5:302019-01-24T22:47:56+5:30
भिवंडी : शहरात बांगलादेशी नागरीक मोठ्या संख्येने रहात असून त्यापैकी फंडोलेनगर येथे रहाणाऱ्या तीन बांगलादेशी नागरीकांना पोलीसांनी अटक करून ...
भिवंडी: शहरात बांगलादेशी नागरीक मोठ्या संख्येने रहात असून त्यापैकी फंडोलेनगर येथे रहाणाऱ्या तीन बांगलादेशी नागरीकांना पोलीसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरात अनेकवेळा आलेल्या बांगलादेशी नागरिकांना पकडून बांगलादेशच्या सीमेवर सोडले जाते परंतू ते पुन्हा या शहरात ाल्याच्या घटना यापुवी४ घडल्या आहेत. शहाबुद्दीन नोकीउल्ला अंन्सारी (३५) हारून खालिक शेख (४९) व नुरूद्दीन शमसुद्दीन अंन्सारी (४०)असे शहरातील फंडोलेनगर येथे पकडलेल्या बांगलादेशी नागरिकांची नांवे असुन त्यांना मंगळवारी पकडून अटक केली आहे. या तिगांकडे शहरातील विविध शासकीय कार्यालयात बनविलेली पॅनकार्ड,आदारकार्ड व पोस्टआॅफिसचे पासबूक मिळाली असून ती जप्त करण्यात आली आहेत. त्यावरून ते शहरात रोजगाराच्या निमीत्ताने शहरात आल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे भारतात येण्याचे पारपत्र नसताना दलालाच्या मदतीने ते बांगलादेशाच्या सीमेवरून त्यांनी भारताच्या हद्दीत प्रवेश केला.हावडा रेल्वे स्थानकातूनते कल्याणमार्गे भिवंडीत आले. शहरात येऊन त्यांनी अनाधिकृतपणे वास्तव्य करून
प्लंबींगचे काम सुरू केले. त्या दरम्यान त्यांनी विविध पुरावे गोळा करीत दलालांच्या माध्यमांतून पॅनकार्ड,आधारकार्ड व पोस्ट कार्यालयांतून पासबूक मिळविले. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तीन बांगलादेशी नागरिकांवर पारपत्राशिवाय भारतात घुसखोरी करून वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडून चौकशी अंती मिळालेले पुरावे पोलीसांनी जप्त केले आहेत. काल बुधवार रोजी त्यांना स्थानिक कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना २८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.