बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी, नातेवाईकांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 10:22 PM2020-12-29T22:22:53+5:302020-12-29T22:23:19+5:30

कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी असं बेपत्ता तरुणाचं नाव असून तो पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णाला फोन आल्यानंतर तो वीस हजार रुपये घेऊन घरातून बाहेर निघाला होता.

Police failed to search for the missing youth, relatives of the deceased stood in front of the Deputy Commissioner's office in bhiwandi | बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी, नातेवाईकांचा ठिय्या

बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात पोलीस अपयशी, नातेवाईकांचा ठिय्या

Next
ठळक मुद्देपाच दिवस उलटून देखील कृष्णाचा पत्ता लागला नसल्याने संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी भिवंडी वाडा मार्ग एक तास रोखून धरला होता.

भिवंडी -भिवंडीतील घुंगट नगर येथे राहत असलेला कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी हा तरुण मागील पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. पोलीस तरुणाचा शोध लावण्यास अपयशी होत असल्याचा आरोप करत कृष्णाच्या नातेवाईकांनी भिवंडी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या मांडला, नातेवाईकांनी अचानक केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. 
           
कृष्णा उर्फ टोनी केशरवाणी असं बेपत्ता तरुणाचं नाव असून तो पाच दिवसांपासून बेपत्ता आहे. कृष्णाला फोन आल्यानंतर तो वीस हजार रुपये घेऊन घरातून बाहेर निघाला होता, परंतु आज पाच दिवस उलटून देखील कृष्णाचा पत्ता लागला नसल्याने संतप्त नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी भिवंडी वाडा मार्ग एक तास रोखून धरला होता. तसेच भिवंडी पोलिस उपायुक्त कार्यालया समोर पोलिस प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी केली अखेर पोलिसांच्या मध्यस्थी नंतर या नातेवाईकांना चर्चा करण्यास बोलावण्यात आले, परंतु यावेळी संतप्त जमावाने पोलिसांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. अखेर भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर नातेवाईकांना समज देऊन घरी पाठवण्यात आले. पोलिसांच्या वतीने सध्या बेपत्ता झालेल्या कृष्णाचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Police failed to search for the missing youth, relatives of the deceased stood in front of the Deputy Commissioner's office in bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.