तोतया पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:51 PM2018-07-06T23:51:48+5:302018-07-06T23:51:58+5:30

नौपाडा पोलिसांनी अटक केलेल्या एका तोतया पोलीस अधिकाºयाविरुद्ध आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका सराफा व्यापाºयास त्याने १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे नव्या तक्रारीतून उघडकीस आले आहे.

 The police filed a further complaint against the looting police officer | तोतया पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

तोतया पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

Next

ठाणे : नौपाडा पोलिसांनी अटक केलेल्या एका तोतया पोलीस अधिकाºयाविरुद्ध आता ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका सराफा व्यापाºयास त्याने १५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे नव्या तक्रारीतून उघडकीस आले आहे.
पोलीस अधिकाºयाच्या वेशात वावरून लोकांना गंडा घालणाºया गजानन पालवे याला नौपाडा पोलिसांनी गतआठवड्यात अटक केली. जुन्या वाहनांची खरेदीविक्री करणाºया एका वितरकाची त्याने आर्थिक फसवणूक केली होती. या तक्रारीच्या चौकशीदरम्यान त्याने केलेल्या आणखी एका पराक्रमाची माहिती पोलिसांना मिळाली.
ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिराजवळ असलेल्या एका सराफा दुकानामध्ये त्याने गतवर्षी काही व्यवहार केले. दुकानमालक कमलेश श्रीश्रीमाल हे ठाण्याच्या सराफा असोसिएशनचे अध्यक्ष असून व्यवहारानिमित्त त्याने त्यांच्याशी परिचय वाढवला. आपण दहशतवादविरोधी पथकामध्ये अधिकारी असल्याचे सांगून त्याने श्रीश्रीमाल यांना मोठमोठ्या अधिकाºयांचा परिचय दिला. सुरुवातीला थोडेफार दागिने उधारित घेऊन त्याने वेळेवर पैसे परत केले. दुकानमालकाचा विश्वास बसल्याची खात्री पटल्यानंतर त्याने सप्टेंबर २०१७ मध्ये १४ लाख ९५ हजार रुपयांचे दागिने घेतले. त्या मोबदल्यात त्याने धनादेश दिला होता. हा धनादेश बँकेत वटला नाही. त्यामुळे दुकानमालकाने आरोपीशी संपर्क साधला असता लवकरच पैसे परत करण्याचे आश्वासन त्याने दिले. एकदा तो पत्नीला घेऊन दुकानावर गेला. सध्या अडचण सुरू आहे, लवकरच पैसे परत करतो, असे त्याने दुकानमालकास सांगितले. दरम्यानच्या काळात नौपाडा पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली. याबाबतच्या बातम्या वाचल्यानंतर श्रीश्रीमाल यांना आरोपीचे खरे रूप समजले. त्यांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर ठाणेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title:  The police filed a further complaint against the looting police officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे