भिवंडीत हरवलेल्या दोन लहान मुलांचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात शोध

By नितीन पंडित | Published: January 10, 2024 09:48 PM2024-01-10T21:48:25+5:302024-01-10T21:48:38+5:30

घटनेचे गांभीर्य ओळखता शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके मुलांच्या शोधासाठी पाठवली होती.

Police find two missing children in Bhiwandi in just two hours | भिवंडीत हरवलेल्या दोन लहान मुलांचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात शोध

भिवंडीत हरवलेल्या दोन लहान मुलांचा पोलिसांकडून अवघ्या दोन तासात शोध

भिवंडी: किराणा दुकानात खाऊ घेण्यासाठी गेलेल्या दोन लहान चिमूरडी मुले हरवल्याची घटना बुधवारी  न्यू आझाद नगर गायत्री नगर परिसरात घडली होती. याबाबत मुलांच्या पालकांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल करताच शांतीनगर पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवून अवघ्या दोन तासात मुलांचा सुखरूप शोध घेत मुलांना आपल्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.

मरियम निसार अहमद खान वय साडेतीन वर्षाची मुलगी व उबेदुल्ला अश्फाक खान वय चार वर्ष मुलगा असे सापडलेल्या मुलांची नावे आहेत. हे दोघेही चिमुरडे न्यू आझाद नगर गायत्री नगर परिसरात किराणा दुकानातून खाऊ घेण्यासाठी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेली होती. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत या मुलांचा शोध परिसरात घेऊनही ही दोन्ही मुले सापडली नसल्याने अखेर मुलांच्या पालकांनी सायंकाळी पाच वाजता शांतीनगर पोलीस ठाण्यात मुले हरवल्याची तक्रार दाखल केली होती. 

घटनेचे गांभीर्य ओळखता शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पथके मुलांच्या शोधासाठी पाठवली होती. यावेळी बीट मार्शल एकचे बीट अंमलदार पोलीस हवालदार गावडे व पोलीस नाईक नवसारे यांना दोन्ही हरवलेली मुले चावींद्रा डम्पिंग ग्राउंड येथे मिळून आली. या दोन्ही मुलांना शांतीनगर पोलिसांनी त्यांच्या पालकांकडे सुखरूप स्वाधीन केले असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा दिली आहे.

Read in English

Web Title: Police find two missing children in Bhiwandi in just two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.