भिवंडीत नवीन ठाणे वसविणा-या बिल्डरांवर गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 07:40 PM2017-11-16T19:40:33+5:302017-11-16T19:40:49+5:30

भिवंडी : तालुक्याच्या ग्रामीण भागात नवीन ठाणे वसविण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत.

Police have not been able to arrest the builders of Bhivandit new Thane Vasota-Bhavnagar despite arrest of the accused | भिवंडीत नवीन ठाणे वसविणा-या बिल्डरांवर गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ

भिवंडीत नवीन ठाणे वसविणा-या बिल्डरांवर गुन्हा दाखल होऊनही अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ

Next

भिवंडी : तालुक्याच्या ग्रामीण भागात नवीन ठाणे वसविण्याचे स्वप्न दाखवून ग्राहकांची फसवणूक करणा-या सहा भागीदार बिल्डरांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही त्यांना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करीत आहेत. तालुक्यात वसई रोड येथील खारबाव, पाये व पायगाव या भागात नवीन ठाणे वसविण्याचे स्वप्न दाखवित वेगवेगळ्या आस्थापनांच्या नावांवर बिल्डरांनी सन २०१३मध्ये विविध ९ प्रोजेक्ट सुरू केले होते.

या प्रोजेक्टपैकी पायेगाव येथील श्री महावीर पटवा डेव्हलपर्स अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन कंपनीने गाळे व इतर बांधकाम सुरू केले होते. परंतु दिलेल्या मुदतीत बांधकाम केलेले गाळे ग्राहकांना न दिल्याने व्यंकटेश शानबाग यांनी राजेश छगनलाल पटवा, विनोद छगनलाल पटवा, शांतीलाल वेलजी छेडा, मनोज नरसी भानुशाली, नानजी शंकरलाल भानुशाली, अक्रम अली मजीदार अली अन्सारी या बिल्डर व्यावसायिकांनी ४ लाख ७४ हजार ४२० रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार तालुका पोलीस ठाण्यात केली आहे. त्याचप्रमाणे इतर सहा जणांनी देखील फसवणूक केल्याप्रकरणी तक्रारी अर्ज पोलिसांकडे दिले आहेत.

काल बुधवारपर्यंत या बिल्डरांच्या विरोधात तक्रारदारांची संख्या ४० झाली असून ही संख्या वाढत आहे. या संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती जाणकारांनी दिली. परंतु पोलीसांनी बिल्डरांविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. उलट या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलून पोलीस तपासाच्या विलंबाकडे पांघरूण घालीत आरोपीला कोर्टाचे संरक्षण देण्यासाठी संधी दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

Web Title: Police have not been able to arrest the builders of Bhivandit new Thane Vasota-Bhavnagar despite arrest of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.