पडघा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
By नितीन पंडित | Published: September 22, 2022 08:30 PM2022-09-22T20:30:35+5:302022-09-22T20:31:28+5:30
ट्रान्सपोर्ट व्यवसायिक वाहनचलकाकडून मासिक ३० हजारांचा हफ्ता घेणारा पोलीस नाईकास ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: ट्रान्सपोर्ट व्यवसायिक वाहनचलकाकडून मासिक ३० हजारांचा हफ्ता घेणारा पोलीस नाईकास गुरुवारी ठाणे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला.
भरत शरद जगदाळे असे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या पोलीस नाईकचे नाव असून तो पडघा पोलीस ठाण्यात कार्यरत होता.पडघा कल्याण रस्त्यावर महत्वाच्या तळवलीफाट्यावर तो कर्तव्यावर असतांना त्याने एका ट्रान्सपोर्ट व्यवसायिक वाहन चालकाकडून ट्रान्सपोर्ट व्यवसाय सुरळीत चालविण्यासाठी महिना ३० हजार रुपये हफ्ता मागितला होता.ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाने याबाबत थेट ठाणे लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला होता.लाचलुचपत विभागाने तळवली नाका येथे सापळा लावला असता पोलीस नाईक जगदाळे याने हफ्त्याची तडजोडी अंती ठरलेली २० हजार रुपयांची रक्कम घेतांना तो जाळ्यात अडकला.