पोलीस अधिकाऱ्याकडून ठाण्यात पट्ट्याने मारहाण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:38 AM2018-08-27T04:38:22+5:302018-08-27T04:38:38+5:30
संतोष पाटील यांचा आरोप : उपायुक्तांकडे तक्रार, पोलिसांकडून आरोपांचे खंडण
ठाणे : शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी पोलीस ठाण्यात बोलवून शिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केल्याचा आरोप डायघर गावातील संतोष पाटील यांनी केला आहे. ही मारहाण पोलीस पाटील यांच्यासमोर केल्याचा आरोप त्यांनी परिमंडळ-१ चे उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे यांनी हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.
तक्रारदार संतोष पाटील हे डायघर पंचकृषी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहे. डायघर गावात होऊ घातलेल्या घनकचरा साठवणूक करणे व विल्हेवाट लावणे, या प्रकल्पाला कायदेशीर मार्गाने ते विरोध करत आहेत. दरम्यान, २३ आॅगस्ट रोजी या प्रकल्पाचे काही कर्मचारी तेथे मोजणी करण्यास आले होते. त्यावेळी त्यांना वरिष्ठ अधिकाºयांशी बैठक होणार असून ती झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे तोपर्यंत येथे मोजणीचे काम करू नये, असे सांगत ते निघून गेले होते. त्यानंतर, शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे कर्मचारी गावित यांनी दुपारी १२ ते २ वाजण्याच्या सुमारास प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी साहेबांनी बोलावले असल्याचा निरोप फोनवर दिला. त्याप्रमाणे मी डायघर गावाचे पोलीस पाटील व इतर दोघे असे पोलीस ठाण्यात गेलो असता तेथील पोलीस अधिकारी बोरसे यांनी संतोष पाटील कोण आहे, अशी विचारणा करत धमकी दिली. त्यांनी एका खोलीमध्ये बसवून ठेवले. पाच मिनिटांनी तीन पोलीस कर्मचारी व बोरसे यांनी मला पोलीस कोठडीत बंद करून ठेवले. १० ते १५ मिनिटांनी बोरसे व अन्य पाच पोलीस कर्मचाºयांनी मला जावळे यांच्या कक्षात नेले. यावेळी पोलीस पाटील गजानन पाटील हे बसले होते. त्यांच्यासमोर जावळे यांनी शिवीगाळ करत कर्मचाºयांना पट्टा आणण्यास सांगितले. दोन कर्मचाºयांना मला धरण्यास सांगून जावळे यांनी माझ्या पाठीवर व डाव्या हाताच्या खांद्यावर व दंडावर मारहाण केली. त्यानंतर, त्या जागेवर गेल्यास गोळ्या घालीन, अशी धमकी दिल्याचा आरोप संतोष पाटील यांनी केला आहे.
यासंदर्भात रविवारी उपायुक्त स्वामी यांना एका शिष्टमंडळाने निवेदन दिले. त्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जावळे आणि पोलीस उपनिरीक्षक बोरसे यांच्यासह तीन कर्मचाºयांना बडतर्फ करण्याची मागणी केली.
प्रसंगी मुख्यमंत्र्याची भेट घेणार; न्यायालयातही दाद मागणार
च्या शिष्टमंडळात आमदार बाळाराम पाटील, लियाकत शेख, संतोष केणे, गणेश म्हात्रे, नगरसेवक बाबाजी पाटील, हिरा पाटील, गोविंद भगत, रोहिदास मुंडे आदी उपस्थित होते. तसेच कारवाई न झाल्यास पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला.
च्वेळप्रसंगी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांची भेट घेऊन त्याच्याकडे तक्रार करून न्यायालयातही दाद मागू, असे सांगितले. दरम्यान, संतोष पाटील याने महापालिकेच्या प्रकल्पाला विरोध केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे.
च्त्याला मारहाण किंवा धमकी दिलेली नाही. त्याने केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे शीळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी सांगितले. आणि आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले.