पोलिसांचा मनाई आदेश केवळ कागदावर; चेणे नदी पात्रात जीवघेण्या पार्ट्यांची रेलचेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 08:07 PM2022-07-24T20:07:13+5:302022-07-24T20:07:37+5:30

चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रात अडकलेल्या तिघा तरुणांना बुडताना वाचवण्याची घटना ताजी असतानाच आज रविवारी नदीपात्रात जीवाची पर्वा न करता अनेकजण उतरले होते.

Police order only on paper deadly parties in chene | पोलिसांचा मनाई आदेश केवळ कागदावर; चेणे नदी पात्रात जीवघेण्या पार्ट्यांची रेलचेल

पोलिसांचा मनाई आदेश केवळ कागदावर; चेणे नदी पात्रात जीवघेण्या पार्ट्यांची रेलचेल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - चेणे येथील लक्ष्मी नदी पात्रात अडकलेल्या तिघा तरुणांना बुडताना वाचवण्याची घटना ताजी असतानाच आज रविवारी नदीपात्रात जीवाची पर्वा न करता अनेकजण उतरले होते. किनारी बिनधास्तपणे पावसाळी मद्य पार्ट्या झडल्या . त्यामुळे पोलिसांनी काढलेले मनाई आदेश केवळ कागदावरच राहिला आहे. 

घोडबंदर मार्गावर काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत लक्ष्मी नदी परिसरात पावसाळी पार्ट्या आणि मौजमजेसाठी मुख्यत्वे तरुण आदी जातात . ह्या ठिकाणी अनेकजण मद्यपान करतात . नदीत बुडून मरण पावल्याच्या व बुडताना वाचवण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत . नुकतेच ४ जुलै रोजी नदी पात्रात मौजमजेसाठी गेलेल्या व पाण्यात अडकलेल्या भाईंदरच्या तिघा  तरुणांना अग्निशन दलाने अथक प्रयत्नांनी वाचवले होते . 

तर उत्तन समुद्रात जीवघेण्या लाटां मध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांना जाग आली आणि मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयाने हद्दीतील सर्व धबधबे, तलाव, धरणे व इतर पर्यटनस्थळांचे १ कि.मी. परिसरात व समुद्रकिनारी जाण्यास, मद्यपान , सेल्फी, प्रदूषण आदींना कलम १४४ जारी करत मनाई केली.  

परंतु पोलिसांनी कागदावर मनाई आदेश जारी केले परंतु प्रत्यक्षात धिक्याच्या ठिकाणी गस्त वा बंदोबस्तच न ठेवल्याने चेणे भागात आज रविवार २४ जुलै रोजी यथेच्छ पार्ट्या झडल्या असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले . परिसरात काहींनी ताडपत्रीने तंबू उभारले . नदीच्या पात्रात धोक्याची पर्वा न करता उतरून आंघोळ व मौजमजा करत होते . परिसरातील विहरीं मध्ये सुद्धा उड्या मारून पोहत होते . पोलिसांचा मनाई आदेश पाण्यात बुडवून हुल्लडबाजी व धिंगाणा दिवसा ढवळ्या सुरु होता.

Web Title: Police order only on paper deadly parties in chene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.