ठाणे आयुक्तांवरील आरोपांची पोलिसांकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:43 AM2018-06-09T01:43:57+5:302018-06-09T01:43:57+5:30

रस्ते काँक्रिटीकरण घोटाळ्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याला धमकाविल्याचा आरोप ठाणे महापालिका आयुक्तांवर करण्यात आला आहे. या आरोपाची चौकशी आता पोलीस उपायुक्त करणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

 Police questioned the allegations against Thane Commissioner | ठाणे आयुक्तांवरील आरोपांची पोलिसांकडून चौकशी

ठाणे आयुक्तांवरील आरोपांची पोलिसांकडून चौकशी

googlenewsNext

मुंबई : रस्ते काँक्रिटीकरण घोटाळ्याप्रकरणी आरटीआय कार्यकर्त्याला धमकाविल्याचा आरोप ठाणे महापालिका आयुक्तांवर करण्यात आला आहे. या आरोपाची चौकशी आता पोलीस उपायुक्त करणार असल्याची माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. आरटीआय कार्यकर्ते प्रदीप पाटील यांना धमकाविल्याप्रकरणी तपास करीत असलेल्या अधिकाऱ्याने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना क्लीन चिट दिली. मात्र, याचिकाकर्त्यांनी जयस्वाल यांनी त्यांच्या घरी बोलावून आपल्याला धमकाविल्याचा आरोप करताच त्याच पोलीस अधिकाºयाने या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती न्यायालयाला दिली. दोन वेगवेगळी विधाने केल्याबद्दल उच्च न्यायालयाने संबंधित पोलीस अधिकाºयावर आपला विश्वास नसल्याचे म्हटले. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास संबंधित पोलीस अधिकाºयाकडून वरिष्ठ अधिकाºयाकडे वर्ग करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले. अन्यथा चौकशीसाठी न्यायालयीन चौकशी करू, अशी तंबीही न्यायालयाने दिली.
अखेरीस शुक्रवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी ठामपा आयुक्तांवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी पोलीस उपायुक्त करतील, असे आश्वासन न्यायालयाला दिले.
पोलीस उपायुक्तांनी १२ जुलैपर्यंत अहवाल सादर करावा,’ असे निर्देश उच्च न्यायालयाने पोलीस उपायुक्तांना दिले.

Web Title:  Police questioned the allegations against Thane Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे