बार व रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा : २२ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:59+5:302021-07-17T04:29:59+5:30
उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पॅरोडाईज बार व रेस्टॉरंटवर पोलिसांनी छापा टाकून २२ जणांविरोधात मध्यवर्ती ...
उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरातील रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पॅरोडाईज बार व रेस्टॉरंटवर पोलिसांनी छापा टाकून २२ जणांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील पॅरोडाईज बार व रेस्टॉरंट रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुरुवारी रात्री साडेदहा वाजता पोलिसांनी पॅरोडाईज बारवर छापा टाकून बार मालक सदानंद शेट्टी यांच्यासह महिला व वेटर, मॅनेजर, वॉचमन आदी २२ जणांना अटक करून, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गेल्या शनिवार-रविवारी नेहरू चौकातील जपानी व गजानन मार्केट परिसरातील फूटपाथवर बाजार भरल्याने नागरिकांनी साहित्य खरेदी करण्यासाठी एकच गर्दी केली होती. बहुतांश दुकानाचे शटर बाहेरून बंद असले तरी आतमधून विक्री होत असल्याचा प्रकार उघड होत आहे.
महापालिका व पोलिसांची कारवाई थंड पडल्याने, सर्वकाही आलबेल सुरू असल्याची चर्चा आहे. पॅरोडाईज बारप्रमाणे उशिरापर्यंत सुरू असलेल्या इतर बारवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.