VIDEO: पोलिसाने जीव धोक्यात घालून मजुरास वाचवले, थरार कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 05:27 AM2019-12-06T05:27:39+5:302019-12-06T05:27:51+5:30
जालन्याच्या घनसावंगी येथील रहिवासी बबन सोनावणे हे काही दिवसांपूर्वी मुंबईत कुटुंबासह आले होते.
ठाणे : ठाणे रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेºयात कै द झालेल्या एका थरारात जालना येथील ऊसतोड मजूर बबन राधाकिसन सोनावणे (५५) हे फलाट क्रमांक-७ वर येणाºया गाडीतून कुटुंबासह जाण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडत होते. त्याचदरम्यान त्यांना गाडी उडवणार, हे पाहून ठाणे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस कॉन्स्टेबल अनिलकुमार यांनी जीव धोक्यात घालून त्यांचे प्राण वाचवले. हे धाडस करणाºया अनिलकुमार यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जालन्याच्या घनसावंगी येथील रहिवासी बबन सोनावणे हे काही दिवसांपूर्वी मुंबईत कुटुंबासह आले होते. ३ डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते कुटुंबासह परतीचा प्रवास करण्यासाठी रेल्वेस्थानकात आले होते. याचदरम्यान ते कुटुंबाला फलाट क्रमांक ७ वर सोडून काहीतरी घेण्यासाठी गेले होते. गाडी फलाटावर येण्याची वेळ झाली असताना ते फलाट क्रमांक ७ वर येताना चुकू न फलाट क्रमांक ६ नंबरवर उतरले. त्यामुळे फलाट क्रमांक ६ वरून उतरून ७ वर घाईघाईत रेल्वेरूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच एक लांब पल्ल्याची गाडी येत असल्याचे त्यांनी पाहिले. बबन यांना रेल्वेरु ळावर पाहताच ट्रेनचालकाने जोरात हॉर्न वाजवला, ज्याचा आवाज ऐकताच घाबरून ते जागीच थांबले. यामुळे आता त्यांना ती गाडी उडवणार असे वाटत असतानाच तिथेच ड्युटीवर तैनात असलेले कॉन्स्टेबल अनिलकुमार यांनी रु ळांवर उतरून त्यांचे प्राण वाचवले. यावेळी समोरून येणाºया गाडीच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक दाबले नसते आणि अनिलकुमार नसते तर बबन सोनावणे त्यांचा मृत्यू अटळ होता. हा संपूर्ण थरार कॅमेºयामध्ये कैद झाला आहे.
#WATCH: RPF Constable Anil Kr, deployed at Thane Railway Station, risked his life to save a man who was crossing the railway track while a train was coming towards him. Kumar jumped onto the track, hauled the man up the platform&then managed to jump out of the train's way.(03.12) pic.twitter.com/Y7sNucBzse
— ANI (@ANI) December 5, 2019
थोडक्यात बचावलेले सदर प्रवासी हे ऊसतोड मजूर असून ते जालना येथील रहिवासी आहेत. त्यांचा जीव वाचवणाºया पोलीस कॉन्स्टेबलला पारितोषिक मिळावे, यासाठी शिफारस केली जाणार आहे. प्रवाशांनी अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून रेल्वेरूळ ओलांडू नये.
- राजेंद्र पांडव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरपीएफ, ठाणे